श्रीगोंदा तालुक्यात चार मोर मृतावस्थेत आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 12:33 IST2021-02-10T12:33:01+5:302021-02-10T12:33:55+5:30
कोकणगाव शिवारात उल्हास दिनकर शिंदे यांच्या शेतात चार मोर मृतावस्थेत आढळले आहेत. त्यामुळे बर्ड फ्ल्यू पार्श्वभूमीवर खळबळ उडाली आहे.

श्रीगोंदा तालुक्यात चार मोर मृतावस्थेत आढळले
श्रीगोंदा : कोकणगाव शिवारात उल्हास दिनकर शिंदे यांच्या शेतात चार मोर मृतावस्थेत आढळले आहेत. त्यामुळे बर्ड फ्ल्यू पार्श्वभूमीवर खळबळ उडाली आहे.
कोळगाव आढळगाव परिसरात मोराची संख्या मोठी आहे. अलिकडच्या काळात ओढ्यानाल्यावर अतिक्रमण वाढले आहे. झाडे, झुडपे कमी झाली आहेत. त्यामुळे मोरांची वसाहत नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
अशा परिस्थितीत कोकणगाव शिवारात चार मोराचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू पिकांवरील विषारी कीटकनाशकमुळे की शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकल्याने झाला कि बर्ड फ्लूमुळे झाला याचा शोध घेणे आवश्यक आहे.