रेल्वेमार्गाजवळ आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:21 IST2021-03-16T04:21:38+5:302021-03-16T04:21:38+5:30
श्रीरामपूर : दौंड- मनमाड रेल्वेमार्गानजीक धनगरवाडी (ता. राहाता) शिवारात एक पुरुषाचा मृतदेह १३ मार्च रोजी पहाटेच्या वेळी आढळून आला. ...

रेल्वेमार्गाजवळ आढळला
श्रीरामपूर : दौंड- मनमाड रेल्वेमार्गानजीक धनगरवाडी (ता. राहाता) शिवारात एक पुरुषाचा मृतदेह १३ मार्च रोजी पहाटेच्या वेळी आढळून आला.
पोलीस निरीक्षक मसूद खान यांनी पथकासह घटनास्थळी पाहणी केली. तपासात मृतदेह संतोषसिंग नामक एका सैनिकाचा असल्याचे समोर आले. तो मूळचा पंजाबमधील रहिवासी असल्याचे त्याच्या खिशातील कागदपत्रांवरून समजले.
पोलिसांनी त्याच्या मोबाईलवर फोन केला असता तो एका रेल्वेगाडीत असल्याचे समोर आले. त्याची बॅगही गाडीतच आढळली. त्यावरून सिंग हे रेल्वेमार्गाच्या कडेला असलेल्या पोलला आदळून जबर मार लागून मृत पावल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ते चालत्या रेल्वेतून पडले की, घातपात झाला, हे पोलीस तपासात निष्पन्न होणार आहे. सिंग यांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली. पंजाबहून त्यांचे नातेवाईक श्रीरामपूरला आले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कारासाठी पंजाब येथे नेला.