नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेचे माजी अध्यक्ष सुवालाल गुंदेचा यांचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 09:11 IST2018-10-16T09:11:00+5:302018-10-16T09:11:15+5:30

नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक सुवालाल गुंदेचा (वय 84) यांचे मध्यरात्री निधन झाले. ते गेल्या सहा महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्यामागे तीन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

Former Urban Multistate Bank Chairman Suvalal Gundecha passed away | नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेचे माजी अध्यक्ष सुवालाल गुंदेचा यांचे निधन 

नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेचे माजी अध्यक्ष सुवालाल गुंदेचा यांचे निधन 

अहमदनगर : नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक सुवालाल गुंदेचा (वय 84) यांचे मध्यरात्री निधन झाले. ते गेल्या सहा महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्यामागे तीन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

शतकोत्तर वाटचाल करणा-या नगर अर्बन बँकेचे ते सलग बारा वर्षे अध्यक्ष होते, तर 48 वर्षे संचालक म्हणून त्यांनी काम केले. सहकारातील कायद्याचा अभ्यास व बँकेच्या हितासाठी त्यांनी आयुष्य वेचले. अहमदनगर बँक  असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र बँकिंग फेडरेशनचे अध्यक्ष, जैन ओसवाल सभेचे 25 वर्षे अध्यक्ष, जैन वात्सल्य संस्था व जैन धर्मशालेचे 30 वर्षे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. 

याशिवाय, सुवालाल गुंदेचा काँग्रेस पक्षासाठी काम करत होते. त्यांनी दहा वर्षापूर्वी नगर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. 
 

Web Title: Former Urban Multistate Bank Chairman Suvalal Gundecha passed away