माजी सभापती डॉ.टी.के.पुरनाळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 13:09 IST2020-10-30T13:08:45+5:302020-10-30T13:09:51+5:30

शेवगाव येथील ज्येष्ठ नेते डॉ.त्र्यंबक काशिनाथ पुरनाळे यांचे गुरुवारी (दि.२९ आॅक्टोबर ) सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. 

Former Speaker Dr. TK Purnale passes away | माजी सभापती डॉ.टी.के.पुरनाळे यांचे निधन

माजी सभापती डॉ.टी.के.पुरनाळे यांचे निधन

शेवगाव : येथील ज्येष्ठ नेते डॉ.त्र्यंबक काशिनाथ पुरनाळे यांचे गुरुवारी (दि.२९ आॅक्टोबर ) सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. 

 ३५ वर्ष जिल्हा परिषद सदस्य, दोन वेळा शेवगाव पंचायत समिती सभापती म्हणून राजकीय कारकीर्द राहिली. सर्व सामान्य कार्यकत्यार्साठी कुठल्याही टोकाची भूमिका घेणारा नेता म्हणून डॉ.टि.के. पुरनाळे यांची ओळख होती. सभापती असताना त्यांनी शेवगाव तालुक्यात विविध विकास कामे केली. 

 जिल्हा परिषदेच्या सदस्या हर्षदा काकडे यांचे ते वडील, तर एफडीएल शिक्षण समूहाचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजीराव काकडे यांचे ते सासरे होत. 

Web Title: Former Speaker Dr. TK Purnale passes away