शिवसेनेचे माजी मंत्री अनिल राठोड यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 08:30 IST2020-08-05T07:48:12+5:302020-08-05T08:30:37+5:30
अहमदनगर: माजी मंत्री, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचे आज पहाटे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

शिवसेनेचे माजी मंत्री अनिल राठोड यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन
अहमदनगर: माजी मंत्री, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचे आज पहाटे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
राठोड यांना आठ दिवसापूर्वी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. राठोड यांच्या मागे पत्नी, एक मुलगी व मुलगा विक्रम राठोड असा परिवार आहे.
अनिल राठोड हे नगर विधानसभा मतदार संघातून गेले 25 वर्ष आमदार म्हणून निवडून आले होते..त्यांच्या निधनाने नगरमधील शिवसेना शोकमग्न झाली आहे. राठोड यांच्यावर सकाळी दहा वाजता अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
दोन दिवसांपूर्वीच कोरोनावर मात; माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुण्यात निधन
शाओमीचा स्वस्तातला Redmi 9A स्मार्टफोन येणार; 6000 पेक्षा कमी किंमत असणार
पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा मुलगा IAS बनला; वाचा प्रदीप सिंह यांची संघर्षमय कहानी
यंदा LIC चा आयपीओ मालामाल करणार; या कंपन्या करणार शेअर बाजारात एन्ट्री