भेंडा कोविड केंद्राला मदतीचा ओघ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:22 IST2021-04-23T04:22:12+5:302021-04-23T04:22:12+5:30
भेंडा : भेंडा बुद्रूक (ता.नेवासा) येथील नागेबाबा भक्त निवासात सुरू असलेल्या. शासकीय कोविड केंद्राला मदत करण्याचे आवाहन तहसीलदार रुपेशकुमार ...

भेंडा कोविड केंद्राला मदतीचा ओघ सुरू
भेंडा : भेंडा बुद्रूक (ता.नेवासा) येथील नागेबाबा भक्त निवासात सुरू असलेल्या. शासकीय कोविड केंद्राला मदत करण्याचे आवाहन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व नागेबाबा परिवाराचे कडूभाऊ काळे यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला आजपासून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
भेंडा येथील कोविड केंद्रात सध्या २०० कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. कोविड केंद्राला सोई-सुविधा पुरविण्यासाठी. कावीळ उपचार केंद्राचे तज्ज्ञ रामचंद्र वाबळे व सुनील वाबळे यांनी त्यांचे वडिलांच्या स्मरणार्थ कोविड केंद्रात एकाच वेळी किमान १० रुग्णांना ऑक्सिजन लावण्याची व्यवस्था व्हावी. यासाठी १ लाख रुपयांची रोख देणगी परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा नगर विभागाचे उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्याकडे दिली.
कोविड केंद्राला मदत रोख किंवा वस्तूंच्या स्वरूपात देण्याचे आवाहन केल्याने एका अज्ञाताने १० पोते गहू व १० पोते तांदळाची मदत डॉ. शिवाजी शिंदे यांच्या हस्ते जमा केली. नागेबाबा परिवाराकडे रोख रकमेच्या मदतीचा ओघ जोरात सुरू आहे. वस्तू व रोख स्वरूपातील मदतीचा वापर कोविड केंद्रातील रुग्णांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी होणार आहे. यासाठी दानशूर व्यक्तींनी धान्य, भाजीपाला, दूध, किराणा किंवा रोख रकमेची मदत करावी.