रस्ता दुरुस्त करा अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:14 IST2021-06-23T04:14:40+5:302021-06-23T04:14:40+5:30
अकोले मोठा पूल, अगस्ती मंदिर काॅर्नर, कृषी उत्पन्न बाजार समिती - रेडे चौफुली, तांभोळ मानेवस्ती या ठिकाणी रस्त्याची ...

रस्ता दुरुस्त करा अन्यथा आंदोलन
अकोले मोठा पूल, अगस्ती मंदिर काॅर्नर, कृषी उत्पन्न बाजार समिती - रेडे चौफुली, तांभोळ मानेवस्ती या ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसामुळे रस्ता खराब झाला तेव्हा डागडुजी करण्यात आली होती त्याचा फार काळ उपयोग झाला नाही. छोटे मोठे अपघात होतात मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रश्नाचे कोणतेही गांभीर्य दिसत नाही. या रस्त्याच्या प्रश्नी २८ जून २०२१ रोजी आंदोलन करण्याचा इशारा मंगेश कराळे, संदीप शिंदे, वाल्मिक नवले, प्रतीक नवले, अरुण हरनामे, युवराज चव्हाण, सुनील माने, ताराचंद माने यांनी दिला आहे.
.............
बाजार समितीच्या पुढे वीरगाव फाट्यापर्यंत सव्वा पाच मीटर रूंदीचा मोठा रस्ता होणार आहे. रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे. पावसाळ्यानंतर लगेच रस्त्याच्या कामास सुरुवात होईल. सार्वजनिक बांधकामला खड्डे बुजविण्यास सांगितले आहे.
- आमदार डाॅ. किरण लहामटे