एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा अपघातात मृत्यू

By सुदाम देशमुख | Updated: October 30, 2023 10:05 IST2023-10-30T10:03:56+5:302023-10-30T10:05:05+5:30

ओढ्यात गाडी उलटून झाला अपघात

five members of the same family died in an accident near newasa fata | एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा अपघातात मृत्यू

एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा अपघातात मृत्यू

नेवासा (जि. अहमदनगर) : अहमदनगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाटाजवळ ओढ्यात गाडी उलटून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना  रविवारी रात्री ११ च्या सुमारास घडली. या अपघातात एक चिमुकली बचावली.
        
मयतांमध्ये एका चिमुकली सह तीन महिला व चालकाचा समावेश आहे. अपघातात मृत पावलेले सर्व व्यक्ती एकाच कुटुंबातील असून ते छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच नेवासा पोलिसांसह नेवासा फाटा परिसरातील नागरिकांनी बचाव कार्यासाठी मदत केली.

Web Title: five members of the same family died in an accident near newasa fata

टॅग्स :Accidentअपघात