शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नेत्यांचा पाचपुतेंना तीव्र विरोध

By admin | Updated: August 26, 2014 23:21 IST

अहमदनगर : राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपा प्रवेशासाठी सज्ज झालेल्या आ.बबनराव पाचपुतेंच्या विरोधात आता भाजपातूनच भक्कम तटबंदी उभी राहू लागली आहे.

अहमदनगर : राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपा प्रवेशासाठी सज्ज झालेल्या आ.बबनराव पाचपुतेंच्या विरोधात आता भाजपातूनच भक्कम तटबंदी उभी राहू लागली आहे. मंगळवारी प्रदेश सरचिटणीस आ.राम शिंदे आणि खा.दिलीप गांधी यांच्या नेतृत्वात नगरच्या शिष्टमंडळाने मुंबईत प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन पाचपुतेंच्या संभाव्य प्रवेशाला कडाडून विरोध केला. या विरोधाची दखल घेत ‘आपल्या तीव्र भावना दिल्लीतील वरिष्ठांच्या कानावर घातल्या जातील’ असा शब्द प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे वृत्त आहे.आ.पाचपुते यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशाबाबत रोज नव्या बातम्या येत आहेत. याबाबत स्थानिक नेत्यांना विश्वासात घेत नसल्याची भावना काही दिवसांपासून भाजपात पसरली आहे. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी या प्रवेशाला जाहीर विरोध सुरु केला आहे. मंगळवारी आ.शिंदे, खा.गांधी यांच्यासह शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, प्रा.भानुदास बेरड, नामदेव राऊत, विनोद बोथरा, अल्लाउद्दीन काझी आदींनी प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांच्यासह विरोधी पक्ष नेते विनोद तावडे आणि संघटनमंत्री रवींद्र भुसारी यांची भेट घेतली. या भेटीत या नेत्यांनी पाचपुते यांच्या प्रवेशाला असणारा विरोध स्पष्टपणे नोंदविल्याचे वृत्त आहे. यावेळी काही नेत्यांनी पाचपुते यांची ‘राजकीय कुंडली’च प्रदेशच्या नेत्यांसमोर मांडली. त्याची दखल घेत फडणवीस यांनी जिल्हा भाजपाच्या भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, आ.पाचपुते यांच्या विरोधात आता भाजपा नेत्यांनीही आघाडी उघडल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक नेते त्यांचा संभाव्य प्रवेश म्हणजे ‘राजकीय संकट’ मानतात. पाचपुते यांनी संभाव्य भाजपा प्रवेशासाठी जिल्हाच नव्हे तर प्रदेश पातळीवरील नेत्यांना डावलून थेट दिल्लीशी संपर्क स्थापित केल्याची चर्चा आहे. हा संपर्कच अनेकांसाठी चिंतेचे कारण ठरले आहे. (प्रतिनिधी)