दरोड्याच्या तयारीतील पाच आरोपी गजाआड, एकाचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 16:47 IST2021-02-03T16:46:44+5:302021-02-03T16:47:45+5:30

श्रीरामपूर शहरातील नार्दन ब्रँच परिसरात रेल्वे भुयारी मार्गाजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच आरोपींना नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. एक आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला.

Five accused in robbery preparations go missing | दरोड्याच्या तयारीतील पाच आरोपी गजाआड, एकाचे पलायन

दरोड्याच्या तयारीतील पाच आरोपी गजाआड, एकाचे पलायन

श्रीरामपूर : शहरातील नार्दन ब्रँच परिसरात रेल्वे भुयारी मार्गाजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच आरोपींना नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. एक आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला.

 अटक केलेल्या आरोपींमध्ये रियाज शेख (वय, २४), आजम शेख (वय २८), करण अनचिते (वय २२), बाबर शेख (वय ४५ सर्व रा.श्रीरामपूर), दानिश पठाण (वय २०, संगमनेर) यांचा समावेश आहे.

सराईत गुन्हेगार आजम शेख हा साथीदारांसह दोन दुचाकीवरून गोपीनाथनगर परिसरातून दरोड्याच्या तयारीने जात असल्याची माहिती कटके यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी भुयारी रेल्वे मार्गाजवळ सापळा रचून दुचाकीवरील पाच आरोपींना ताब्यात घेतले. तपासात त्यांच्याकडून सुरा, कटावणी, मिरचीपूड, चार मोबाईल, दोन दुचाकी असा एक लाख ३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

 

Web Title: Five accused in robbery preparations go missing