राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नगर केंद्रातून ‘एक होता बांबुकाका’ प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 16:24 IST2019-12-06T16:23:33+5:302019-12-06T16:24:14+5:30

५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत अहमदनगर केंद्रातून रंगकर्मी प्रतिष्ठानच्या ‘एक होता बांबुकाका’ या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले.

The first one was 'Bambucaka' from the city center | राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नगर केंद्रातून ‘एक होता बांबुकाका’ प्रथम

राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नगर केंद्रातून ‘एक होता बांबुकाका’ प्रथम

अहमदनगर : ५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत अहमदनगर केंद्रातून रंगकर्मी प्रतिष्ठानच्या ‘एक होता बांबुकाका’ या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले. अहमदनगर जिल्हा हौशी नाटय संस्थेच्या ‘मोमोज’ या नाटकाला द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने शुक्रवारी केली आहे. 
एक होता बांबुकाका व मोमोज या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. घोडेगाव येथील समर्थ युवा प्रतिष्ठान या संस्थेच्या ‘रात संपता संपेना’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.
 प्राथमिक फेरीचे अहमदनगर केंद्रावरील अन्य निकाल असे-
दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक शैलेश देशमुख (नाटक-एक होता बांबूकाका), द्वितीय पारितोषिक उर्मिला लोटके (नाटक-मोमोज), प्रकाश योजना : प्रथम पारितोषिक मुन्ना सय्यद (नाटक-एक होता बांबुकाका), द्वितीय पारितोषिक रवी रहाणे (नाटक-अमन या शांती), नेपथ्य : प्रथम पारितोषिक अनंत रिसे (नाटक-दास्ताँ), द्वितीय पारितोषिक  संभाजी पिसे (नाटक-शापित माणसांचे गुपित), रंगभूषा : प्रथम पारितोषिक नाना मोरे (नाटक-अमन या शांती), द्वितीय पारितोषिक ज्योती कराळे (नाटक-शापित माणसांचे गुपित), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक राहुल सुराणा (नाटक-एक होता बांबुकाक) व रेणुका भिसे (नाटक- शापित माणसांचे गुपित), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे प्राजक्ता प्रभाकर (नाटक-अमन या शांती), पूर्वा खताळ (नाटक-लहान माझी बाहुली), आम्रपाली गायकवाड (नाटक-मलिका), दिव्या पाटील (नाटक- रात संपता संपेना), रविना सुगंधी (नाटक-दास्ताँ), श्रेणिक शिंगवी (नाटक-दास्ताँ), सुरेश चौधरी (नाटक- रात संपता संपेना), नवनाथ वाबळे (नाटक-शेवंता जिती हाय), श्रीराम गोरे (नाटक-अमन या शांती), मार्दव लोटके (नाटक-मोमोज).
१६ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०१९ या कालावधीत नगर येथील  माऊली सांस्कृतिक सभागृहात  या स्पर्धेत एकूण १७ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रामदास तांबे, श्रीकांत सागर, डॉ. पी. एन. कुंदा  यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: The first one was 'Bambucaka' from the city center