नवनिर्वाचित सदस्यांची पहिलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:23 IST2021-03-23T04:23:06+5:302021-03-23T04:23:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर सर्वसाधारण विशेष ग्रामसभेचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. ...

The first of the newly elected members | नवनिर्वाचित सदस्यांची पहिलीच

नवनिर्वाचित सदस्यांची पहिलीच

लोकमत न्यूज नेटवर्क

खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर सर्वसाधारण विशेष ग्रामसभेचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. नवनिर्वाचित सदस्यांची पहिलीच ग्रामसभा होती. सरपंच नमिता गोपाळघरे अध्यक्षस्थानी होते.

कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. यावेळी ग्रामविकास आराखड्याला मान्यता देण्यात आली. नागरिकांचे विविध अर्ज, समस्यांवर चर्चा होऊन त्यांच्या शंकेचे निरसन करण्यात आले. अनेक दिवसांपासूनच स्मशानभूमीची नोंद व्हावी यासाठी नागरिक पाठपुरावा करत होते. त्यासाठी शासन दरबारी अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न करण्यावर चर्चा झाली.

यावेळी उपसरपंच रंजना लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य कांचन शिंदे, संजीवनी पाटील, सुनीता जावळे, वैभव जमकावळे, गजेंद्र काळे, सुग्रीव भोसले, मदन गोलेकर, अशोक खटावकर ,प्रकाश गोलेकर, महालिंग कोरे, बाबासाहेब मोरे, राजू मोरे, महेश दिंडोरे, डॉ. सोपान गोपाळघरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, सेवा सोसायटी अध्यक्ष चंद्रकांत गोलेकर,उपाध्यक्ष श्रीकांत लोखंडे, गहिनीनाथ जगताप, पोपटराव भुते, प्रमोद जोशी गुरुजी, श्रीहरी साबळे, ज्ञानेश्वर इंगोले आदी उपस्थित होते. ग्राम विकास अधिकारी प्रशांत सातपुते यांनी आभार मानले.

Web Title: The first of the newly elected members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.