शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

पहिली पसंती निर्णायक ठरणार

By admin | Updated: December 24, 2015 23:37 IST

अहमदनगर: विधान परिषद निवडणुकीत चार उमेदवार असले तरी सेनेचे शशिकांत गाडे व राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अरुण जगताप यांच्यातच खरी लढत रंगली आहे़

अहमदनगर: विधान परिषद निवडणुकीत चार उमेदवार असले तरी सेनेचे शशिकांत गाडे व राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अरुण जगताप यांच्यातच खरी लढत रंगली आहे़ त्यामुळे पहिल्या पसंतीची मते निर्णायक ठरण्याची शक्यता बळावली आहे़ पहिल्या फेरीत निकालाचे चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे़काँग्रेसचे अपक्ष उमेदवार जयंत ससाणे यांनी माघार घेतली आहे़ परंतु ससाणे यांचे मतपत्रिकेत नाव कायम आहे़ याशिवाय मच्छिंद्र सुपेकर अपक्ष उमेदवार आहेत़ चारपैकी ए आणि बी, उमेदवार सक्रिय आहेत़ ए आणि बी एकमेकांचे प्रतिस्पर्धी असून, दोघांमध्येच खरी लढत सुरू असल्याचे चित्र सध्या तरी आहे़ मतदारांना पहिली पसंती देणे बंधनकारक आहे़ उर्वरित दोन, तीन, आणि चार, या क्रमांची मते ऐच्छिक आहेत़ त्यामुळे ए उमेदवाराला पहिली पसंती देणारा मतदार विरोधक बी ला दुसरी पसंती देणार नाही़ बी उमेदवाराला पहिली पसंती देणारा मतदार ए ला दुसरी पसंती देणार नाही़ कारण पहिल्या फेरीत २१६ चा कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या क्रमांकाची मते मोजली जातील़ दुसऱ्या फेरीत डी आणि सी ला मते मिळाली नाहीत, असे गृहीत धरल्यास दुसरी फेरीची मते मोजण्याची आवश्यकता राहणार नाही. दुसऱ्या क्रमांकावर दगा फटका होऊ शकतो़ त्यामुळे हा धोका कुणीही स्वीकारणार नाही़ उमेदवारांकडूनही तसाच प्रचार सुरू आहे़ पहिल्या पसंतीवरच ए आणि बी उमेदवाराने लक्ष केंद्रीत केले असल्याने दुसऱ्या फेरीची गरज पडणार नाही, असे म्हणण्यास वाव आहे़ पहिल्या पसंतीच्याच मतांची मागणी दोन्ही उमेदवार करत आहेत़ दुसऱ्या क्रमांकाचा धोका नकोच, अशी सावध भूमिका प्रचारात घेतली जात आहे़ निवडणुकीतून सी उमेदवाराने माघार घेतल्याने त्यांना मतदान होणार नाही़ पण, निष्ठावंतांकडून सी उमेदवाराला मतदान होण्याची शक्यता गृहीत धरून त्यांच्या मतांची मोजणी करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. परंतु त्याची आवश्यकता पडणार नाही, असाही एक सूर आहे़ (प्रतिनिधी)उतरत्या क्रमाने उमेदवारांची यादीपहिल्या क्रमांकाची सर्वाधिक मते मिळणारा उमेदवार प्रथम क्रमांकावर असेल़ त्यापेक्षा कमी मते मिळणारा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असणार आहे़ मिळालेल्या मतानुसार उतरत्या क्रमांकाने ए, बी,सी, आणि डी उमेदवारांची क्रमवारी लावली जाईल़ ए आणि बी उमेदवारालाच मते पडली आणि इतरांना मते मिळाली नाही तर अशावेळी पहिल्या क्रमांकाची सर्वाधिक मते असणारा उमेदवार विजयी म्हणून घोषित करण्यात येईल़