मढीत तीन दुकानांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 16:33 IST2019-09-11T16:32:37+5:302019-09-11T16:33:25+5:30

मढी येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास चैतन्य कानिफनाथ मंदिरासमोरील फूल, हार, नारळ, पुजेचे साहित्य, ग्रंथ, पारायण, मूर्ती, विक्री आदी साहित्यांची विक्री करणाºया तीन दुकानाला आग लागली. आगीत सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

Fire up three shops in Madi | मढीत तीन दुकानांना आग

मढीत तीन दुकानांना आग

मढी : येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास चैतन्य कानिफनाथ मंदिरासमोरील फूल, हार, नारळ, पुजेचे साहित्य, ग्रंथ, पारायण, मूर्ती, विक्री आदी साहित्यांची विक्री करणाºया तीन दुकानाला आग लागली. आगीत सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
 श्रीक्षेत्र मढी येथे चैतन्य कानिफनाथांची संजीवन समाधी आहे. येथे रोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांसाठी येथे पूजेचे साहित्य व इतर वस्तू विक्रीसाठी अनेक दुकाने थाटलेली आहेत. मंगळवारी मध्यरात्री आगीत तीन दुकाने जळून खाक झाली. आग आटोक्यात आणण्यासाठी पाथर्डी नगरपालिका, वृद्धेश्वर कारखान्याच्या अग्निशमन दलाला पाचारण  केले होते. परंतु आगीचे रौद्र रूप असल्याने दुकाने तोपर्यंत खाक झाली होती. परंतु शेजारील २०-२५ दुकाने वाचविण्यात यश आले. आगीच्या घटनेचा पंचनामा केला आहे. आगीचे निश्चित कारण मात्र समजू शकले नाही. 

Web Title: Fire up three shops in Madi