अखेर महापालिकेला मिळाले पूर्णवेळ आयुक्त : श्रीकृष्ण भालसिंग यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 17:03 IST2019-03-05T17:03:30+5:302019-03-05T17:03:44+5:30
जवळपास १ वर्षाच्या कालावधीनंतर अहमदनगर महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळाले.

अखेर महापालिकेला मिळाले पूर्णवेळ आयुक्त : श्रीकृष्ण भालसिंग यांची नियुक्ती
अहमदनगर : जवळपास १ वर्षाच्या कालावधीनंतर अहमदनगर महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळाले. औरंगाबाद महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांची अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या वर्षभर जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्याकडे महापालिकेचा अतिरिक्त कार्यभार होता. राहुल व्दिवेदी यांनी सीना नदीकाठचे अतिक्रमण हटविण्यासह इतरही कामे केली. तसेच त्यांच्या काळात महापालिकेची निवडणुकही पार पडली.