दारुबंदीसाठी महिला आक्रमक
By Admin | Updated: July 19, 2014 00:36 IST2014-07-18T23:25:34+5:302014-07-19T00:36:42+5:30
शेवगाव : तालुक्यातील राक्षी येथील महिला व ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावात दारूबंदीचा ठराव संमत केला. गावातील दारू विक्रीसह सर्व अवैध धंदे बंद न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा ग्रामसभेत देण्यात आला.
दारुबंदीसाठी महिला आक्रमक
शेवगाव : तालुक्यातील राक्षी येथील महिला व ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावात दारूबंदीचा ठराव संमत केला. गावातील दारू विक्रीसह सर्व अवैध धंदे बंद न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा ग्रामसभेत देण्यात आला.
राक्षी गावात गेल्या काही दिवसांपासून दारूच्या आहारी जावून अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले आहेत. यामध्ये तरुणांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे ग्रामस्थ विशेषत: महिलांनी गावात दारूबंदीचा ठराव करण्याची मागणी केली होती. त्यानुसार शुुक्रवारी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्रीधर कातकडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ग्रामसभेत दारूबंदी तसेच इतर अवैध धंदे तातडीने बंद करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हा पोलीस प्रमुखांना देण्याविषयी निर्णय झाला.
संबंधित अधिकाऱ्यांची ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासह भेट घेऊन दारूबंदीची मागणी करण्यात आली.
यावेळी सरपंच भागुबाई लाड, उपसरपंच हनुमान कर्डिले, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ, महिला हजर होत्या.
(तालुुका प्रतिनिधी)
तर उद्देशपूर्ती
राक्षी गावात सुरू असलेल्या दारूच्या खुलेआम विक्रीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन गावाच्या विकासाला खिळ बसत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी गावात दारूबंदी तसेच इतर अवैध व्यवसाय बंद करण्याचा निर्धार केला आहे. पोलिसांनी सहकार्य केल्यास या मोहिमेचा उद्देश सफल होणार आहे.
कुसुम तातेळ, सदस्या- तंटामुक्त गाव समिती