शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

शेतकरी आपल्या घरासमोर जाळणार मूठभर कापूस, २२ मेला आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 20:48 IST

अहमदनगर : आधारभूत किमतीनुसार कापूस खरेदीत होणाºया दिरंगाईमुळे कोट्यवधी रुपयांचा कापूस खरेदीवाचून राहण्याची शक्यता आहे. शेतकरी संघटनेने यापूर्वीच केलेल्या मागण्या मान्य न केल्यामुळे शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी २२ मे रोजी कापूस उत्पादक जिल्ह्यात प्रत्येक शेतकरी मूठभर कापूस जाळण्याचे आंदोलन करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : आधारभूत किमतीनुसार कापूस खरेदीत होणाºया दिरंगाईमुळे कोट्यवधी रुपयांचा कापूस खरेदीवाचून राहण्याची शक्यता आहे. शेतकरी संघटनेने यापूर्वीच केलेल्या मागण्या मान्य न केल्यामुळे शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी २२ मे रोजी कापूस उत्पादक जिल्ह्यात प्रत्येक शेतकरी मूठभर कापूस जाळण्याचे आंदोलन करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.  या पत्रकात म्हटले आहे की,विदर्भ मराठवाड्यात शेतकºयांनी लाखो क्विंटल कापूस विक्रीसाठी बाजार समितीत नोंदणी केली आहे. सिसिआय व कॉटन फेडरेशनमार्फत सुरु असलेली कापूस खरेदी अतिशय धिम्या गतीने सुरु आहे. या गतीने सर्व लांब धाग्याचा कापूस सुद्धा मोजून होणार नाही. शेतकरी संघटनेने अनेकदा खरेदी केंद्र वाढवण्याची शासनाकडे मागणी केली आहे. मात्र शासनाने त्याचा विचार केलेला नाही. सिसिआयच्या एफएक्यू ग्रेडमध्ये लांब, मध्यम व आखूड अशा तीन प्रती आहेत. मात्र शासनाने फक्त लांब धाग्याचाच कापूस विकत घेण्याचे आदेश दिले असल्यामुळे शेतकºयांना आपला कापूस मातीमोल भावाने व्यापाºयाला विकावा लागत आहे.शासकीय खरेदीचा वेग पहाता पावसाळ्यापूर्वी सर्व कापूस खरेदी होण्याची शक्यता नाही. त्यासाठी शासनाने, आवश्यक तेथे, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा वापर करुन शासकीय खरेदी सुरु करावी. किंवा शेतकºयांनी जिन मालकाला किंवा व्यापाºयाला विकलेला कापसाच्या व आधारभूत किमतीच्या फरकाची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा करुन भावांतर योजना राबवावी.  शासनाच्या चालढकल वृत्तीचा मोठा आर्थिक फटका राज्यातील कापूस उत्पादकांना सोसावा लागणार आहे. शासनाच्या या हलगर्जीपणाचा निषेध करण्यासाठी, राज्याच्या कापूस उत्पादक जिल्ह्यात २२ मे रोजी सकाळी ११ वाजता, कापूस उत्पादक शेतकरी आपल्या घरासमोर मूठभर कापूस जाळून शासनाचा निषेध करतील, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.------

जनहित याचिका दाखल करणारकापूस उत्पादक शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे. एफएक्यू दर्जाचा कापूस असूनही नाकारल्या गेलेल्या कापसाचे नमुने घेऊन त्याचे पंचनामे करावेत. त्यांची अधिकृत चाचणी करुन प्रत निश्चित करण्यात येणार आहे. एफएक्यू दर्जाचा असूनही नाकारल्या गेलेल्या कापसाची नुकसान भरपाई शासनाने द्यावी, अशी विनंती न्यायालयात करण्यात येणार आहे.