शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
5
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
6
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
7
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
8
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
9
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
10
Marathi News LIVE: मुंबईकरांवर पाणीसंकट, १५ मेपासून १० टक्के पाणी कपातीचा निर्णय, जलाशयात घट
11
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
12
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
13
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
14
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
15
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
16
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
19
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
20
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या शिवार फेरीने शेतकरी सुखावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST

केडगाव : दुपारची एक वाजताची वेळ.. रणरणते ऊन.. चिखल पाण्याचा निसरडा रस्ता.. चिखलातच रुतलेले पाय.. यासह अधिकाऱ्यांची झालेली दमछाक.. ...

केडगाव : दुपारची एक वाजताची वेळ.. रणरणते ऊन.. चिखल पाण्याचा निसरडा रस्ता.. चिखलातच रुतलेले पाय.. यासह अधिकाऱ्यांची झालेली दमछाक.. आणि इच्छित स्थळी पोहोचल्यावर सर्वांनी सोडलेला सुस्कारा.. प्रसंग होता शिवार भेटीचा आणि ब्रिटिशकालीन झालेल्या साठवण बंधाऱ्याची पाहणी करण्याचा. नगर तालुक्यातील कामरगाव येथे जि. प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी ग्रा. पं. कार्यालयास भेट दिली. त्यांनी गावात चालू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.

त्यानंतर शिवार भेटीचे नियोजन झाले. गावकुसापासून कामरगाव -पिंपळगाव कौडा सीमेवर १ किमी अंतरावर वालुंबा नदीवर ब्रिटिशकालीन दगडी साठवण बंधारा आहे. तेथे जाण्यासाठी चांगला रस्ता नाही. पावसामुळे झालेला चिखल-पाणी व नदीकाठी वाढलेले उंच गवत यातून पायपीट करून १ किमी अंतर पार करीत भोर यांनी तत्कालीन बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत आलेल्या अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांचीदेखील दमछाक झाली. बंधाऱ्याचे बांधकाम दर्जेदार असल्याचे पाहून ते अचंबित झाले. लागलीच त्यांनी बंधाऱ्याच्या खोलीकरणासह मजबुतीकरणाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. हे काम पूर्ण झाल्यास परिसरातील विहिरी, विंधन विहिरींच्या पाण्याची पातळी उंचावून ५० हेक्टर जमीन बारामाही ओलिताखाली येईल, असा आशावाद ग्रामस्थांनी व्यक्त केला.

शिवार फेरीच्या वेळी सरपंच तुकाराम कातोरे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश ठोकळ, ग्रा. पं. सदस्य संदीप ढवळे, अ‍ॅड. प्रशांत साठे, ग्रा. पं. लिपिक लक्ष्मण ठोकळ, योगेश ठोकळ, ग्रामसेवक सुरेश मगर, अभियंता एम. डी. झावरे, रवींद्र माळी, मच्छिंद्र जाधव, गणेश खाडे, संतोष साठे, विजय भुजबळ, उल्हास दळवी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्ह्यातील कामाचा प्रचंड ताण असताना भोर यांनी वेळ देऊन ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेतल्या व कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले, त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

----

शासनाच्या लोकाभिमु‌ख योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी भोर यांचा शिवार भेटीचा उपक्रम स्तुत्य व प्रेरणादायी आहे.

- तुकाराम कातोरे,

सरपंच, कामरगाव

190721\img-20210718-wa0462.jpg

कामरगाव शिवार भेट फोटो