देवळाली प्रवरात शेतक-याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 21:15 IST2019-09-04T21:14:36+5:302019-09-04T21:15:19+5:30
देवळाली प्रवरा येथील प्रकाश सोपान चव्हाण(वय-५५) या शेतक-याने कर्जाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

देवळाली प्रवरात शेतक-याची आत्महत्या
राहुरी/देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा येथील प्रकाश सोपान चव्हाण(वय-५५) या शेतक-याने कर्जाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी रात्री ही घटना घडली. पण ती बुधवारी सकाळी लक्षात आली. विहिरीचे पाणी पाच तास मोटारीने ऊपसल्यानंतर त्यांचा मृतदेह विहिरीत आढळला. आंबी रस्त्यालगतच्या घरापासून जवळच्या विहिरीत प्रकाश चव्हाण यांचा मृतदेह आढळला.
कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची माहिती आत्महत्याग्रस्त शेतकºयाचा मुलगा गणेश सोपान चव्हाण यांनी दिली. पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.