तंबाखू न दिल्यानं भावानेच केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 18:47 IST2019-02-06T18:47:25+5:302019-02-06T18:47:42+5:30

तंबाखू न दिल्याच्या रागातून विटाने मारहाण केल्याने चुलतभावाने मारहाण केल्याने जखमी झालेल्या भावाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

The family did not give the tobacco | तंबाखू न दिल्यानं भावानेच केला खून

तंबाखू न दिल्यानं भावानेच केला खून

जामखेड : तंबाखू न दिल्याच्या रागातून विटाने मारहाण केल्याने चुलतभावाने मारहाण केल्याने जखमी झालेल्या भावाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मयताच्या मृत्यूस आरोपी हाच कारणीभूत असल्याची फिर्याद दाखल झाल्यामुळे जामखेड पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.
याबाबत रत्ना काका देडे (वय २७ रा. अरोळेवस्ती जामखेड) हिने फिर्याद दाखल केली आहे. शनिवार (दि.२) रोजी सायंकाळी साडेसहा वाजता काका मारूती देडे (वय २९, रा. अरोळेवस्ती, जामखेड) घरासमोर बसले होते. त्यावेळी तेथे आरोपी रामा बबन देडे (वय २८, रा. अरोळेवस्ती जामखेड) आला. त्याने काका देडे यास तंबाखू मागितली. परंतु काका देडे याने तंबाखू दिली नाही. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमकझाली. आरोपी रामा देडे याने काका देडे यास विटाने मारहाण करून जखमी केले. जखमी काका देडे यास मारहाणीमुळे अस्वस्थ वाटू लागले. त्यादरम्यानच काका देडे यास हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. या मृत्यूस आरोपी रामा देडे हाच कारणीभूत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. काका देडे याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे.
पोलीसांनी आरोपी रामा देडे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे करीत आहेत.

Web Title: The family did not give the tobacco