गर्भवती महिलेचा मुलासह छतावरून पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 18:58 IST2018-10-28T18:58:02+5:302018-10-28T18:58:06+5:30
शिडीर्तील गणेशवाडी भागात इमारतीच्या तिस-या मजल्यावरुन पडून गर्भवती आई आणि चार वर्षाच्या मुलाचा दुर्देवी अंत झाल्याची घटना आज घडली.

गर्भवती महिलेचा मुलासह छतावरून पडून मृत्यू
शिर्डी : शिडीर्तील गणेशवाडी भागात इमारतीच्या तिस-या मजल्यावरुन पडून गर्भवती आई आणि चार वर्षाच्या मुलाचा दुर्देवी अंत झाल्याची घटना आज घडली. हा घातपात असल्याचा संशय मयत वैशाली साईदास शिंदे यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
आज दुपारच्या सुमारास गर्भवती असलेली वैशाली शिंदे आणि मुलगा अथर्व शिंदे घराच्या छतावरून खाली पडलेल्या अवस्थेत आढळल्या. स्थानिक नागरिकांनी दोघांनाही साईबाबा संस्थानच्या साईबाबा रुग्णालयात उपचारासाठी आणले. हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषीत केले आहे. मयत वैशालीचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला असुन या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी मयत वैशालीचे नातेवाईक करत आहे.