शिर्डी : विधिच्या नावाखाली महिलांवर बलात्कार करणारा भोंदूबाबा अशोक खरात सावकारीही करत असल्याचे उघड झाले आहे. शिर्डीतील एका शेतकऱ्याची त्याने दहा कोटी रुपयांची मालमत्ता लुबाडल्याची तक्रार आहे. शिर्डी पोलिसांनी खरात व पत्नी कल्पना अशोककुमार खरात (रा. नाशिक), किरण सोनवणे (रा. निमगाव), अरविंद बातके (रा. साकुरी) व अशोक प्रभात तांबे या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नीलाही अटक होण्याची शक्यता आहे.
रावसाहेब गोंदकर यांची शिर्डी व निघोज परिसरात दहा एकर वडिलोपार्जित जमीन आहे. कर्जाचे हप्ते थकल्याने ते आर्थिक अडचणीत होते. यावेळी त्यांचा मित्र किरण सोनवणे याने नाशिकचे कॅप्टन अशोक खरात हे व्याजाने पैसे देतात, अशी माहिती दिली.
गोंदकर व सोनवणे या दोघांना मिळून तीन कोटी रुपयांची गरज होती. त्यासाठी ऑगस्ट २०२३ मध्ये नाशिक येथे बैठक होऊन खरात याने २ टक्के व्याजाने पैसे देण्याचे कबूल केले. मात्र, सुरक्षेसाठी जमीन खरेदीखत करून देण्याची अट घातली. गोंदकर यांनी विश्वासाने आपली चार एकर जमीन खरातच्या नावे करून दिली. कोऱ्या चेकवर सह्या घेतल्या. मात्र जेव्हा जमीन परत मागण्यासाठी संपर्क साधला, तेव्हा खरातने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली, त्याचे ऑफिसही बंद आढळले.
अधिकारीही मिरगावला
अहिल्यानगर जिल्ह्यातील काही अधिकारीदेखील खरातच्या मीरगाव येथील आश्रमात जाऊन तेथे काही राजकीय नेत्यांना भेटत होते. राजकीय नेते तेथे आले की ते अधिकाऱ्यांना बोलवून घेत होते. अधिकाऱ्यांना तेथे का बोलवले जात होते? याची प्रशासनात चर्चा सुरू आहे.
प्रॉपर्टी रॅकेट तपासणीतून बडे मासे लागणार गळाला?
खरातचे निर्माण केलेले प्रॉपर्टी रॅकेट देखील तपासले जाणार आहे. १५०० ते २००० कोटींची माया खरातने कशी जमविली? याचा उलगडा होणार असल्याने काही राजकीय मंडळी, शासनातील उच्चपदस्थ अधिकारी, बडे व्यावसायिक, तसेच काही विकासक चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. खरात प्रकरणात राज्य सरकार सुरुवातीपासून अत्यंत संवेदनशील आणि तत्परतेने कारवाई करत असल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कोणतीही ढिलाई करणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. खरातवर प्रतिक्रिया दिली नसल्याची टीका त्यांच्यावर होत होती.
Web Summary : Self-proclaimed guru Ashok Kharat allegedly seized farmer's land worth crores. He faces charges, including illegal money lending, along with his wife and associates. Police investigation ongoing to uncover the property racket and political connections.
Web Summary : फर्जी गुरु अशोक खरात पर किसान की करोड़ों की जमीन हड़पने का आरोप है। पत्नी और साथियों समेत उसके खिलाफ अवैध रूप से पैसे उधार देने के आरोप लगे हैं। संपत्ति रैकेट और राजनीतिक संबंधों का खुलासा करने के लिए पुलिस जांच जारी है।