आॅक्झिलियमची बाजी
By Admin | Updated: July 17, 2014 00:29 IST2014-07-16T23:15:20+5:302014-07-17T00:29:37+5:30
अहमदनगर : जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेला येथील वाडिया पार्क क्रीडा संकुलात बुधवारपासून प्रारंभ झाला.
आॅक्झिलियमची बाजी
अहमदनगर : जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेला येथील वाडिया पार्क क्रीडा संकुलात बुधवारपासून प्रारंभ झाला. भाऊसाहेब फिरोदिया व रेसिडेन्शीअल हायस्कूलचा पराभव करत आॅक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूलचा मुलींचा संघ उपउपांत्य फेरीत पोहचला आहे.
महापौर संग्राम जगताप, आयुक्त विजय कुलकर्णी यांनी पेनल्टी शूट आऊट करून स्पर्धेचे उद्घाटन केले.
१४ वर्षाखालील मुलांचे १० संघ, १७ वर्षाखालील मुलांचे ८ संघ व मुलींचे ३ संघ अशा २१ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. पहिल्या दिवशी आॅक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल, फिरोदिया व रेसिडेन्शीअल स्कूलच्या मुलींच्या संघाचे सामने झाले़ यामध्ये आॅक्झिलियम स्कूलच्या मुलींच्या संघाने फिरोदिया व रेसिडेन्शीअल स्कूलचा ३ विरुध्द १ ने पराभव करत उपउपांत्य फेरीत धडक मारली. तर मुलांच्या संघात आॅक्झिलियम स्कूलने सेक्रेट हार्ट स्कूलचा पराभव करीत पहिला सामना जिंकला.
ही स्पर्धा शुक्रवारपर्यंत चालणार असून, शुक्रवारी (दि़१८) स्पर्धेतील अंतिम सामना खेळविला जाणार आहे़ अंतिम सामना विजेत्यांना भरघोस बक्षिस व सुब्रोतो कप देऊन गौरविण्यात येणार आहे़
(प्रतिनिधी)