मनपाचे आस्थापनाप्रमुख लहारे यांची हकालपट्टी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:18 IST2021-01-15T04:18:43+5:302021-01-15T04:18:43+5:30
अहमदनगर: महिला कर्मचाऱ्यांची गैरवर्तणूक करणाऱ्या आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे यांची पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख ...

मनपाचे आस्थापनाप्रमुख लहारे यांची हकालपट्टी करा
अहमदनगर: महिला कर्मचाऱ्यांची गैरवर्तणूक करणाऱ्या आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे यांची पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
सेनेचे शहरप्रमुख सातपुते यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की महापालिकेतील आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे यांच्याविरुद्ध कर्मचाऱ्यांना त्रास देणे, महिलांची छेड काढणे, विनाकारण त्रास देणे, याबाबत महिला कर्मचाऱ्यांनी वरीष्ठांकडे तक्रारी केलेल्या आहेत. तसेच शिवसेना उपनेते स्व. अनिल भैया राठोड यांनीदेखील याबाबत तक्रार केली होती. काही महिलांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. या तक्रारीवरून करण्यात आलेली चौकशी संशयास्पद असून अहवाल तत्कालीन आयुक्तांना सादर करण्यात आलेला आहे. मात्र लहारे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. तत्कालीन आयुक्त यांनी लहारे यांची बदली केली होती. परंतु त्यास स्थागिती देण्यात आली असून, लहारे यांची अस्थापनाप्रमुख पदावरून तातडीने हकालपट्टी करवी, अशी मागणी सातपूते यांनी जिल्हाधिकारी तथा आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.
..
नगरविकास मंत्र्यांकडून कारवाईचे संकेत
महापालिकेचे अस्थापना प्रमुख लहारे यांच्यावरील कारवाईबाबात शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी दूरध्वनीद्वारे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी महानगरपालिकेकडून ताबडतोब मागविण्यात येईल. अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले.