उधारी मागीतल्याने माजी सैनिकाने हॉटेल मालकावर रोखले पिस्तुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 12:03 IST2020-07-03T12:02:07+5:302020-07-03T12:03:10+5:30
हॉटेलची उधारी वारंवार मागत असल्याच्या रागातून थेट हॉटेल मालकावर त्याच्या कॅबिनमध्ये जाऊन पिस्तुल रोखत ठार मारण्याची धमकी दिली. गुरुवारी (दि.२) दुपारी चार वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरातील डॉ.विठठलराव विखे पाटील नागरी सहकारी पतसंस्था येथे ही घटना घडली.

उधारी मागीतल्याने माजी सैनिकाने हॉटेल मालकावर रोखले पिस्तुल
कोपरगाव : हॉटेलची उधारी वारंवार मागत असल्याच्या रागातून थेट हॉटेल मालकावर त्याच्या कॅबिनमध्ये जाऊन पिस्तुल रोखत ठार मारण्याची धमकी दिली. गुरुवारी (दि.२) दुपारी चार वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरातील डॉ.विठठलराव विखे पाटील नागरी सहकारी पतसंस्था येथे ही घटना घडली.
याप्रकरणी पोलिसांनी विजय नारायण वडांगळे (वय ४६,रा. वडांगळे वस्ती, स्टेशन रोड, कोपरगाव ) यांच्या फिर्यादीवरून राजेश रामकृष्ण जोशी (रा.वडांगळे वस्ती, कोपरगाव) या माजी सैनिकावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
वडांगळे यांचे स्टेशन रोडवर हॉटेल आहे. या हॉटेल मध्ये राजेश जोशी हे येत होते. त्यांच्याकडे हॉटेलची उधारी होती.