देशासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:26 IST2021-08-19T04:26:01+5:302021-08-19T04:26:01+5:30
पिपाडा म्हणाल्या, राहाता शहराच्या वैभवात भर पडावी, म्हणून राहाता नगरपालिका हद्दीतील नाना-नानी पार्क विकसित केले. नगर-मनमाड रोडलगत छत्रपती शिवाजी ...

देशासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे
पिपाडा म्हणाल्या, राहाता शहराच्या वैभवात भर पडावी, म्हणून राहाता नगरपालिका हद्दीतील नाना-नानी पार्क विकसित केले. नगर-मनमाड रोडलगत छत्रपती शिवाजी महाराज गार्डन विकसित होत आहे. जुन्या नगरपालिकेजवळील गार्डन विकसित होत आहे. राम मंदिराजवळील गार्डन विकसित करणे. त्रिशूलनगर येथील गार्डन विकसित करणे अशी विविध गार्डनची कामे पूर्णत्वाकडे जात आहेत. राहाता शहरातील नागरिकांना अल्पदरात शुद्ध व थंड पाणी वॉटर एटीएमच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिले. यामुळे जनतेचे आरोग्याचे प्रश्न कमी झाले. नगरपालिकेच्या वतीने शहरात अडीच हजार वृक्षांचे संरक्षित जाळीसह रोपण केलेले आहे.
राहाता शहराला पाणीटंचाईच्या काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये, म्हणून राहाता शहरातील २० एकरांतील तळ्यात पाणी सोडले. यामुळे तेथील वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लवकरच इलेक्ट्रिक पोलचे काम पूर्ण होऊन सदर योजना पूर्ण होणार आहे. राहाता शहरात वाड्या-वस्त्यांवर ज्या-ज्या ठिकाणी रस्ते झालेले नव्हते, अशा ठिकाणी रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर कामे झाली. राहाता शहरात अद्ययावत अशा स्मशानभूमीचे काम सुरू आहे. नगरपरिषदेशेजारी नागरिकांना फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅकचे काम सुरू आहे. काही दिवसांतच ते पूर्ण होऊन राहाता शहराचा पुन्हा एकदा चेहरा मोहरा बदलणार आहे. चितळी रोड ते मायंबा मंदिरासमोरील रस्ता डांबरीकरण करून विकसित करण्यात आला.
( राहाता)