शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कुत्रे भुंकले तरी हत्ती थाटातच चालतो, आमदार लंकेंच्या समर्थनात इंदुरीकर महाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 19:53 IST

तहसीलदारांनी ऑडिओ क्लिपमध्ये केलेल्या आरोपांबाबत आमदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया दुसरी बाजू सांगितली आहे. तसेच, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचीही भेट निलेश लंकेंनी घेतली आहे. आता, निलेश लंकेंच्या समर्थनार्थ हभप किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकरही उतरले आहेत.

ठळक मुद्देतहसीलदारांनी ऑडिओ क्लिपमध्ये केलेल्या आरोपांबाबत आमदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया दुसरी बाजू सांगितली आहे. तसेच, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचीही भेट निलेश लंकेंनी घेतली आहे.

अहमदनगर - पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या ऑडिओ क्लिपमुळे राज्यभर एकच खळबळ उडाली आहे. लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा मार्ग आपण स्वीकारला आहे, असे त्यांनी क्लिपमध्ये म्हटले आहे. त्यानंतर, आमदार निलेश लंकेंच्या कामकाजावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तर, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच समर्थनही केलंय. आता, इंदूरीकर महाराजांनीही निलेश लंकेंचं समर्थन केलं आहे. 

तहसीलदारांनी ऑडिओ क्लिपमध्ये केलेल्या आरोपांबाबत आमदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया दुसरी बाजू सांगितली आहे. तसेच, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचीही भेट निलेश लंकेंनी घेतली आहे. आता, निलेश लंकेंच्या समर्थनार्थ हभप किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकरही उतरले आहेत. इंदुरीकरांनी निलेश लंकेंच्या कार्याचं कौतुक केले. येथील शरद पवार आरोग्य मंदिरात इंदुरीकर महाराजांचे किर्तन आयोजित केले होते. या किर्तनावेळी त्यांनी निलेश लंकेंवर स्तुतीसुमने उधळली. तसेच, कुत्रे कितीही भुंकले तरी हत्ती थाटात चालत असतो, असे म्हणत आरोपांकडे दुर्लक्ष करण्याचेही सूचवले आहे. 

निलेश लंकेचं स्पष्टीकरण

तहसीलदारांच्या कारभाराबाबत अरुण आधळे हे उपोषणाला बसले होते. त्यानंतर प्रशासनाने केलेल्या चौकशीत तहसीलदारांच्या कामकाजातील अनेक त्रुटी आढळल्या आहेत. याबाबतचा अहवाल मंत्रालयात गेलेला आहे. त्या अहवालामुळे आपणावर कारवाई होऊ शकते, या भीतीमुळे तहसीलदारांनी अशी ऑडिओ क्लिप बनवून आपल्या बचावाचा प्रयत्न केला आहे.

अण्णा हजारेंची भेट घेतली

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबतचे सर्व पुरावे आमदार निलेश लंके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना दिले आहेत. या प्रकरणी वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, पण असे अधिकारी तालुक्यात नकोत, अशी भूमिका अण्णा हजारे यांनी घेतली आहे. त्यामुळे देवरे यांच्यापुढील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

लोकप्रतिनीधींवर ज्योती देवरेंचे आरोप 

आत्महत्या केलेल्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून देवेरे यांनी या क्लिपमध्ये निवेदन केले आहे. शुक्रवारी सकाळी ही क्लिप सोशल मीडियावर पोस्ट झाली. मी लवकरच तुझ्यासोबत येत असल्याचे सांगत, महिला म्हणून प्रशासनात कसा छळ होतो, लोकप्रतिनिधी कसा त्रास देतात आणि वरिष्ठ त्यांना कसे पाठीशी घालतात, याबाबत त्यांनी या क्लिपमध्ये आरोप केले आहेत. आपल्या विरुद्ध विधिमंडळात प्रश्न मांडणे, दमदाटी करणे, मी मारहाण केल्याची तक्रार माझ्या गाडीचालकाकडून लिहून घेणे, अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये तक्रार दाखल करण्याची धमकी देणे, असे अनेक प्रकार घडले आहेत, असे देवेरे यांनी आपल्या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे. याबाबतचे निवेदन कथन करताना त्या अनेकदा रडतही आहेत. 

टॅग्स :MLAआमदारindurikar maharajइंदुरीकर महाराजAhmednagarअहमदनगरParnerपारनेर