अमरापूरला जनशक्ती कोविड सेंटरची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:21 IST2021-04-22T04:21:29+5:302021-04-22T04:21:29+5:30

शेवगाव : तालुक्यातील अमरापूर हायस्कूल येथे शिवाजीराव काकडे व जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांच्या प्रयत्नातून जनशक्ती कोविड केअर ...

Establishment of Janshakti Kovid Center at Amarpur | अमरापूरला जनशक्ती कोविड सेंटरची उभारणी

अमरापूरला जनशक्ती कोविड सेंटरची उभारणी

शेवगाव : तालुक्यातील अमरापूर हायस्कूल येथे शिवाजीराव काकडे व जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांच्या प्रयत्नातून जनशक्ती कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.

ॲड. शिवाजीराव काकडे, डॉ. श्वेता फलके व डॉ. अरविंद पोटफोडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे, जनशक्तीचे शहराध्यक्ष सुनील काकडे, सुरेश चौधरी, राजेंद्र पोटफोडे, प्राचार्य आर. एन. मगर, सरपंच विजय पोटफोडे, म्हतारदेव आव्हाड, भारत भालेराव, शिवाजी कणसे, शिवाजी औटी, रज्जाकभाई शेख, विष्णू दिवटे, राजेंद्र फलके, अशोक दातीर, अर्जुन पठाडे, शहादेव वाकडे, शेषराव फलके आदी उपस्थित होते.

काकडे म्हणाले, जागतिक महामारीच्या संकटात जनसेवा हा मानवतेचा धर्म आहे, या भावनेतूनच सर्वांनी काम केले पाहिजे. आज कोविड रुग्णांसाठी अमरापूर येथे सेंटर सुरू केले आहे. संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी वर्गणी करून रुग्णांच्या दोन्ही वेळची जेवण, नाश्त्याची व इतर सुविधांची सोय केली आहे.

---

२१अमरापूर

Web Title: Establishment of Janshakti Kovid Center at Amarpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.