पाचेगावात पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:14 IST2021-06-23T04:14:45+5:302021-06-23T04:14:45+5:30
मराठी शाळेतील शिक्षक आणि शालेय व्यवस्थापन समितीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत माजी पोलीस पाटील रंगनाथ पवार, बळीराजा पार्टीचे जिल्हाध्यक्ष ...

पाचेगावात पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव
मराठी शाळेतील शिक्षक आणि शालेय व्यवस्थापन समितीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत माजी पोलीस पाटील रंगनाथ पवार, बळीराजा पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ तुवर, अशोकचे संचालक दिगंबर तुवर, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब उंडे, सामाजिक कार्यकर्ते अशोकराव नांदे, माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक हनुमंत पाटील, मराठी शाळेचे प्रभारी जालिंदर दिवटे, सोसायटीचे माजी अध्यक्ष विठ्ठल गोळेचा, भाऊसाहेब तुवर, दादा पवार आदींनी विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यासाठी भरघोस आर्थिक मदत दिली. पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांना १३२ उजळणी पुस्तके, १३२ पेन्सिल आणि ३९६ वह्या आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. पहिलीच्या वर्गात प्रवेश करणाऱ्या नवागतांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी भारत सर्व सेवा संघाचे सचिव प्रकाश जाधव, शिवाजी कांबळे, केंद्रप्रमुख दौलत तुवर, वटवृक्ष फाउंडेशनचे सचिव शिवाजी जाधव, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मांजरे, गणीभाई शेख, उर्दूचे मुख्याध्यापक जमीर शेख आदी उपस्थित होते.