तळेगाव विद्यालयात कथाकथन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:37 IST2021-02-05T06:37:15+5:302021-02-05T06:37:15+5:30

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, संगमनेर शाखेतर्फे तळेगाव दिघे विद्यालयात कथाकथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सेवानिवृत्त मुख्याध्यापक ...

Enthusiasm for storytelling in Talegaon Vidyalaya | तळेगाव विद्यालयात कथाकथन उत्साहात

तळेगाव विद्यालयात कथाकथन उत्साहात

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, संगमनेर शाखेतर्फे तळेगाव दिघे विद्यालयात कथाकथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सेवानिवृत्त मुख्याध्यापक शांताराम डोंगरे यांनी 'अन् शिल्पा कलेक्टर झाली...' या विषयावर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कथाकथन केले. प्रसंगी प्राचार्य एच. आर. दिघे, पर्यवेक्षक संजय दिघे, चंद्रभान हापसे, बी. सी. दिघे, तुकाराम सोळसे, राधाकिसन दिघे, भागवत दिघे यांसहित पदाधिकारी उपस्थित होते.

डोंगरे यांनी विद्यार्थ्यांनी चांगले ते आचरणात आणावे, असे आवाहन करीत 'अन् शिल्पा कलेक्टर झाली...' या विषयावर भावस्पर्शी कथाकथन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतमाता पूजन करण्यात आले. प्रास्ताविक चंद्रभान हापसे यांनी केले. सूत्रसंचालन संजय दिघे यांनी केले. प्राचार्य एच. आर. दिघे यांनी आभार मानले.

फोटो : ३१ कथाकथन

तळेगाव दिघे : येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कथाकथन करताना सेवानिवृत्त मुख्याध्यापक शांताराम डोंगरे दिसत असून, व्यासपीठावर मान्यवर.

Web Title: Enthusiasm for storytelling in Talegaon Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.