विजेच्या खांबात वीज प्रवाह उतरला; राहुरीत युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 13:17 IST2020-06-07T13:16:36+5:302020-06-07T13:17:17+5:30

राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा शिवारातील शेतात तेजस येणारे (वय १७) या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना ५ जून रोजी दुपारी घडली. 

The electric current flowed into the power pole; Death of a youth in Rahuri | विजेच्या खांबात वीज प्रवाह उतरला; राहुरीत युवकाचा मृत्यू

विजेच्या खांबात वीज प्रवाह उतरला; राहुरीत युवकाचा मृत्यू

राहुरी : तालुक्यातील वाघाचा आखाडा शिवारातील शेतात तेजस येणारे (वय १७) या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना ५ जून रोजी दुपारी घडली. 

    डिग्रस गावातील रहिवासी असलेला तेजस चंद्रकांत येणारे हा ५ जून रोजी दुपारी वाघाचा आखाडा येथील त्याच्या शेतात शेती कामासाठी गेला होता. शेतात असणाºया विजेच्या खांबातील विद्युत प्रवाह जमिनीत उतरल्याने विजेच्या खांबाचा त्याला तीव्र झटका बसला. यात तेजस याचा जागीच मृत्यू पावला.

     गेल्या दोन दिवसापूर्वी आलेल्या निसर्ग चक्री वादळाने तालुक्यात अनेक ठिकाणी विद्युत तारा व खांब कोसळले होते. त्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरु होते. यामुळेच ही घटना घडल्याची चर्चा आहे. 

     तेजस येणारे याच्या मृत्यूची राहुरी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: The electric current flowed into the power pole; Death of a youth in Rahuri