शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 22:24 IST

Ahilyanagar Municipal Election: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत अहिल्यानगरमधून मोठी बातमी समोर आली. 

राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत अहिल्यानगरमधून मोठी बातमी समोर आली. शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी आज अधिकृतपणे स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेली जागावाटपाची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर शिंदेसेनेने महायुतीकडे पाठ फिरवली. 

अहिल्यानगर शहरात महायुतीच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. परंतु, भाजप व राष्ट्रवादीने आमच्याच सात जागांवर दावा केला. त्यांच्या अवास्तव मागण्यांमुळे आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा अनिल शिंदे  यांनी सोमवारी केली. भाजप, राष्ट्रवादीमुळे ही युती तुटली, असा आरोपही त्यांनी केला.

शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीतून बाहेर पडत असल्याचे यावेळी जाहीर केले. पक्षाचे राज्य प्रवक्ते संजीव भोर, शहरप्रमुख सचिन जाधव, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, अनिल लोखंडे यावेळी उपस्थित होते. "महापालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढविण्यावर तिन्ही पक्षांचे एकमत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांशी आमची चर्चा सुरू होती", असेही अनिल शिंदे म्हणाले.

अनिल शिंदे पुढे म्हणाले की, "आम्ही २४ जागा मागितल्या होत्या. वाटाघाटीची आमची तयारी होती. आमच्या वाट्याला आलेल्या जागांवर कोण उमेदवार द्यायचे? हा आमचा अधिकार आहे. परंतु, त्यांनी आमच्या प्रभाग क्रमांक ११, १५ आणि १६ मधील सात जागांवर दावा केला. आम्ही या जागा सोडण्यास नकार दिला. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशीही चर्चा केली. दरम्यान, सोमवारी सायंकाळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विश्वासू नितीन कुंकलोळ यांच्याकडून तुमचे व आमचे जमणार नाही, असा निरोप आला. त्यानंतर आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे."

महायुतीच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता

अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेने घेतलेल्या या भूमिकेमुळे महायुतीच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्या जागांवर शिवसेना आणि भाजपमध्ये चुरस आहे, तिथे याचा थेट फायदा विरोधी पक्षांना होऊ शकतो. आता या निर्णयावर महायुतीचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde's Shiv Sena to Fight Alone in Ahilyanagar; Alliance Fails

Web Summary : Shinde's Shiv Sena will contest Ahilyanagar municipal elections independently after seat-sharing talks with BJP failed. The party sought 23 seats but was offered only 9, leading to the decision. This move could split Mahayuti votes.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Ahilyanagar Municipal Corporation Electionअहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक २०२६Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा