वीजचोरी करणाऱ्या आठ जणांना एक लाखाचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:26 IST2021-08-14T04:26:13+5:302021-08-14T04:26:13+5:30

पाथर्डी : वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर महावितरणकडून धडक मोहीम हाती घेऊन दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने शहरातील आठ ...

Eight lakh fine for power theft | वीजचोरी करणाऱ्या आठ जणांना एक लाखाचा दंड

वीजचोरी करणाऱ्या आठ जणांना एक लाखाचा दंड

पाथर्डी : वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर महावितरणकडून धडक मोहीम हाती घेऊन दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने शहरातील आठ ग्राहकांवर ५ हजार ७०३ युनिट चोरी केल्याप्रकरणी १ लाख ३ हजार ४४० रुपये दंड केल्याची माहिती शहर सहायक अभियंता मयूर जाधव यांनी दिली.

शहरातील वामनभाऊ नगर, म्हस्के कॉलनी, विजयनगर, नाथनगर या भागात कारवाई करून दंडात्मक रक्कम भरण्याची नोटीस देण्यात आली आहे. दंडाची रक्कम भरण्यासाठी चोवीस तासांची मुदत महावितरण कार्यालयाकडून देण्यात आली आहे. संबंधित दंड न भरणाऱ्या ग्राहकांवर यापुढची कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

प्रमुख साहाय्यक अभियंता हितेश ठाकूर, साहाय्यक अभियंता मयूर जाधव यांच्या मार्गदर्शनाखालील या पथकात आस्थापना विभागाचे प्रवीण घोरपडे, लेखा विभागाचे प्रमुख सहदेव शिरसाठ, दीपक मुसळे, गणेश वायखिंडे, लाइन स्टाफ अरुण दहिफळे, राजू म्हस्के, नवनाथ धायताडक, कृष्णा बर्डे, राजाराम जाधव, सुदर्शन शिरसाठ, नितीन खेडकर, लक्ष्मण वाधवणे, प्रधान तंत्रज्ञ अभिषेक अन्नदाते, ऋषीकेश शिरसाठ, भास्कर मरकड, देविदास शेळके आदींचा सहभाग होता.

130821\img-20210813-wa0020.jpg

फोटो ओळी:-पाथर्डी वीज चोरी रोखण्यासाठी महावितरण कडून भरारी पथक कारवाईसाठी स्थापन केले.

Web Title: Eight lakh fine for power theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.