कोपरगावात गुरुवारी आठ बाधित रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:47 IST2020-12-11T04:47:05+5:302020-12-11T04:47:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : कोपरगावात गुरुवारी (दि.१० डिसेंबर) रोजी रॅपिड अॅण्टिजेन कीटद्वारे ६० व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात ...

कोपरगावात गुरुवारी आठ बाधित रुग्ण आढळले
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : कोपरगावात गुरुवारी (दि.१० डिसेंबर) रोजी रॅपिड अॅण्टिजेन कीटद्वारे ६० व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात ७ व्यक्ती बाधित तर ५३ व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. नगर येथील अहवालात १ असे एकूण ८ रुग्ण आढळले आहेत. १९ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
गुरुवारी बाधित रुग्णांमध्ये कोपरगाव शहरातील साईनगर १, निवारा १, गजानननगर १, तालुक्यातील चासनळी ३ व संवत्सर येथील २ या रुग्णांचा समावेश आहे. १० डिसेंबरअखेर २५४९ कोरोनाची लागण झाली. त्यात ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६६ बाधित व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. उर्वरित २४४१ बाधित व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत तालुक्यातील १७ हजार ८८४ व्यक्तींची कोरोनाची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ हजार ७४३ व्यक्तीची नगर येथे स्त्राव पाठवून तर १४ हजार १४१ व्यक्तींची रॅपिड अॅण्टिजेन कीटद्वारे तपासणी केली आहे.