आठ सायकलपटूंचा श्रीगोंद्यात सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST2021-06-24T04:15:53+5:302021-06-24T04:15:53+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंदा ते तिरुपती बालाजी हे १ हजार २० किमीचे अंतर श्रीगोंद्यातील आठ सायकलपटूंनी अवघ्या सात दिवसात पार ...

आठ सायकलपटूंचा श्रीगोंद्यात सन्मान
श्रीगोंदा : श्रीगोंदा ते तिरुपती बालाजी हे १ हजार २० किमीचे अंतर श्रीगोंद्यातील आठ सायकलपटूंनी अवघ्या सात दिवसात पार केले. अग्निपंख फाऊंडेशनने सायकलपटू अशोक खेंडके, नवनाथ दरेकर, संपत इधाटे, गणेश श्रीराम, शुभम गांजुरे, नितीन ननवरे, अमोल मखरे, शुभम धर्माधिकारी यांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला. या प्रेरणा सोहळ्याला आमदार बबनराव पाचपुते, नागवडे कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, सुभाष शिंदे यांनी सायकलपटू व अग्निपंखच्या उपक्रमांचे कौतुक केले. अशोक खेंडके, नवनाथ दरेकर यांनी सायकल यात्रेतील अनुभव सांगितले. प्रास्ताविक गोरख आळेकर यांनी केले.
यावेळी उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे, शहाजी खेतमाळीस, सतीश मखरे, प्रशांत गोरे, ज्ञानेश्वर गांजुरे, दिलीप काटे, मधुकर काळाणे, सतीश लगड, अमोल गव्हाणे उपस्थित होते. सूत्रसंचालन विशाल चव्हाण यांनी केले.
---
२३ श्रीगोंदा सन्मान
श्रीगोंदा शहरातील सन्मान सोहळ्याप्रसंगी सायकलपटू व मान्यवर.