आधी मुलीवर अत्याचार नंतर तिच्या पित्यालाही केले ठार; शेवगाव तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 19:38 IST2020-02-08T19:37:56+5:302020-02-08T19:38:54+5:30

मुलीवर अत्याचार करणा-या नराधमांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याच्या रागातून तिच्या पित्याचीही निर्घृण हत्या केली. शेवगाव तालुक्यातील सोनविहीर येथे शुक्रवारी (दि़.७) सायंकाळी ७ वाजता ही घटना घडली. 

Earlier, her father was killed after she was abused; Events in Shegaon taluka | आधी मुलीवर अत्याचार नंतर तिच्या पित्यालाही केले ठार; शेवगाव तालुक्यातील घटना

आधी मुलीवर अत्याचार नंतर तिच्या पित्यालाही केले ठार; शेवगाव तालुक्यातील घटना

शेवगाव : मुलीवर अत्याचार करणा-या नराधमांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याच्या रागातून तिच्या पित्याचीही निर्घृण हत्या केली. शेवगाव तालुक्यातील सोनविहीर येथे शुक्रवारी (दि़.७) सायंकाळी ७ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी मयताच्या पत्नीने येथील पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.  
     शेवगाव तालुक्यातील सोनविहीर येथे राहत असलेल्या शेतमजूर दाम्पत्याची मुलगी काही दिवसांपूर्वी नेवासा तालुक्यातील मोरे चिंचोरा येथे नातेवाईकांकडे गेली होती. तेथे विकास फुलसिंग भोसले याने सदर मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. ही बाब मुलीच्या पित्याला समजली तेव्हा विकास भोसले, रवी भोसले व त्यांच्या इतर नातेवाईकांविरोधात सोनई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींविरोधात कलम ३७६ (अत्याचार) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. आपल्या विरोधात गुन्हा दाखल केल्याच्या कारणातून विकास भोसले, रवी भोसले व त्यांना मदत करणारा सुरेश पुंजाराम काळे हे पीडित मुलीच्या पित्याशी नेहमी भांडण करीत होते. पंधरा दिवसांपूर्वी विकास व रवी भोसले हे सोनविहीर येथे सुरेश काळे याच्या घरी येऊन राहत होते़. विकास हा ‘तुझी मुलगी मला देऊन टाका मी तिच्यासोबत लग्न करणार’ असे पीडित मुलीच्या पित्याकडे आग्रह करीत होता. आपल्या मुलीचे त्या आरोपीशी लग्न लावून देण्यास पीडितेच्या माता-पित्यांनी नकार दिला. मुलगी देण्यास नकार दिल्याचा राग आरोपींना होता. शुक्रवारी सायंकाळी पीडित मुलीचे माता-पिता त्यांच्या सोनविहीर येथील घरी जेवन करत होते. याचवेळी सुरेश काळे, रवी भोसले व विकास भोसले यांनी कु-हाड, चाकू व बांबूने पीडित मुलीच्या पित्यावर हल्ला केला. यावेळी जखमी झालेल्या मुलीच्या पित्याने स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिघा आरोपींनी त्यांच्या अंगावर जागोजागी वार करून जखमी केले. यावेळी मुलीच्या आईने आरडाओरड केल्यानंतर तिघे मारेकरी पळून गेले. जखमीला शेवगाव येथे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्यातील आरोपीच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथक रवाना करण्यात आले. असल्याचे शेवगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामराव ढिकले यांनी सांगितले. 

Web Title: Earlier, her father was killed after she was abused; Events in Shegaon taluka