श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरात महिनाभरापासून सुरू असलेल्या साथ रोगाचा जोर अजूनही कायम आहे. येथील वार्ड नंबर दोनमध्ये राहणाऱ्या बुशरा इम्तियाज पठाण या सात वर्षाच्या मुलीचा डेंग्यूसदृश्य आजाराने बुधवारी मृत्यू झाला. पहिलीत शिकणारी बुशरा ही तापाने फणफणली होती. उपचारासाठी तिला श्रीरामपूरच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला लोणी अथवा श्रीरामपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. दोन दिवस तिच्यावर लोणी येथे उपचार सुरू होते. बुधवारी तिचा मृत्यू झाला. डेंग्यू आजारानेच तिचा मृत्यू झाल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले. शहरातील मोरगे वस्ती भागात चिकनगुणियाचे रूग्ण असल्याची माहिती नागरिकांनी दिली. शहरात मलेरिया, टाईफाईडचे रुग्ण असून त्यांनी दवाखाने आजही फुल्ल भरल्याचे चित्र आहे.बुशरा हिच्या मृत्युची माहिती मात्र श्रीरामपूर नगरपालिकेला नाही. तेथील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुशरा हिच्या मृत्युबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगून हात वर केले.(प्रतिनिधी)
श्रीरामपुरात डेंग्यू सदृश आजाराने मुलीचा मृत्यू
By admin | Updated: September 14, 2016 23:23 IST