शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पवनचक्क्यांमुळे डोंगरकुशीतील गावे धोक्यात

By admin | Updated: August 4, 2014 00:44 IST

हेमंत आवारी, अकोले आढळा खोऱ्यातील विश्रामगड-बित्तमगड परिसराचा डोंगरमाथा पवन चक्क्यांच्या उभारणीमुळे पोखरला

हेमंत आवारी, अकोलेआढळा खोऱ्यातील विश्रामगड-बित्तमगड परिसराचा डोंगरमाथा पवन चक्क्यांच्या उभारणीमुळे पोखरला असल्याने या भागातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या टुमदार आदिवासी खेड्यांतील लोकांचा जीव मुठीत आला आहे. संभाव्य धोक्याचे तज्ज्ञांकडून व सरकारी यंत्रणेकडून सर्वेक्षण व्हावे,अशी मागणी पुढे येत आहे. तालुक्यात बित्तमगड व पट्टा किल्ला भागातील जायनावाडीचा महाकाय डोंगर, एकदरा, तिरडे, कोकणवाडी, वारंघुशी, शेणीत, मान्हेरे, खिरविरे, कोंभाळणे भागात जवळपास अडिचशे पवन चक्क्या उभारल्या गेल्या आहेत. प्रकल्प उभारणीसाठी डोंगर खडक फोडून रस्ते तयार करण्यात आले आहेत. वीज वाहून नेण्यासाठी खांब, टॉवरचे जाळे परिसरात झाले आहे. महाकाय दगड डोंगरापासून अलग होऊन घरंगळत शेत जमिनीत आले आहेत. पवनचक्कीचे पाते फिरताना मोठा आवाज सतत घोंगत असतो. या डोंगरमाथ्यावर पूर्वी पावसाचे पाणी ओघळून येत असे, परंतु आता पाणी माथ्यावरच जिरत असल्याने भूस्खलनाचा धोका वाढला आहे. त्यामुळे डोंगराच्या पोटात वसलेल्या आदिवासी खेड्यांना धोका निर्माण झाला आहे. भीमाशंकर ते त्र्यंंबकेश्वर या पट्ट्यातील ही गावे असून पावसाळ्यात येथील डोंगर चिंब होतात. भविष्यात ‘माळीण’ गावासारखी दुर्घटना होऊ नये यासाठी संभाव्य धोकादायक खेड्यांचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. पर्वतराईचा खडक पक्का असला तरी काही ठिकाणी पवनऊर्जा प्रकल्पामुळे तो ठिसूळ झाला आहे म्हणून संभाव्य धोका वाढला आहे. बितका एकदरे परिसरातील डोंगराची माती खचल्याने पाण्याचा चर गाडला गेला. इतिहासाची आठवण जून २००५ मध्ये घाटघर गावाजवळ डोंगराचे भूस्खलन होऊन शाहीनाला आडला गेला होता. घाटघर जलविद्युत प्रकल्पातील ‘लोअर डॅम’चे पाणी वीज निर्मिती बोगद्यात घुसले, त्यात मोठी वित्त व जिवीतहानी झाली. या दुर्घटनेमुळे घाटघर येथील ‘रोप वे’ ची उभारणी सरकारला बंद करावी लागली. गत वर्षी दुर्गम फोफसंडी येथे भूस्खलन झाले. काही वर्षांपूर्वी शिरपुंजे गावाजवळील बहिरोबाच्या डोंगराचा कडा कोसळून खाली आदिवासींच्या घरावर आल्याने नुकसान झाले होते. आजही डोंगरावरुन घरंगळत आलेले ‘ते’ महाकाय दगड भूस्खलनाची आठवण करुन देतात. एकदरा, गावठा, कोकणेवाडी, जायनावाडी, बाभूळवंडी, पिंपळगाव नाकविंदा, गुहीरे, सरोवरवाडी तेरुंगण, पाचनई, पेठेवाडी, रतनवाडी, कोल्हाटवाडी, जहागीरदारवाडी, बारी अशी गावे डोंगर पोटाला वसली आहेत. विकासकामे करताना पर्यावरण तज्ज्ञांकडून तपासणी करुन सल्ला घेण्यात यावा. पर्यावरणपूरक कामे व्हावेत. निसर्गदत्त ठेव्याला धोका पोहचता कामा नये. नाहीतर निसर्ग माफ करणार नाही.- शांताराम गजे, पर्यावरणवादी लेखक