दारूच्या नशेत मुलाने केला बापाचा खून; आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 10:49 IST2020-05-18T10:49:07+5:302020-05-18T10:49:43+5:30

दारूच्या नशेत मुलानेच बापाचा खून केला. ही घटना परिसरातील बोरी(ता. अकोले) शिवारात रविवारी (दि.१७ मे) दुपारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. 

Drunken son kills father; Accused arrested | दारूच्या नशेत मुलाने केला बापाचा खून; आरोपीस अटक

दारूच्या नशेत मुलाने केला बापाचा खून; आरोपीस अटक

कोतूळ  : दारूच्या नशेत मुलानेच बापाचा खून केला. ही घटना परिसरातील बोरी(ता. अकोले) शिवारात रविवारी (दि.१७ मे) दुपारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. 
 कोतूळ परिसरात बोरी व भोळेवडी शिवाराच्या हद्दीवर आठ दहा घरांच्या कांबळेवस्तीवर रविवारी दुपारी तीन वाजता आरोपी राजेंद्र भागवत कांबळे (वय ४४) हा दारू पिऊन आला. घरात वडील भागवत गोमा कांबळे (वय ७०) हे होते. तू दारू का पितोस? असे वडिलांनी समजावून सांगत असताना आरोपीने वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी वडिलांच्या डोक्यातही मारहाण केली. यामुळे वडील कांबळे हे गंभीर जखमी झाले. यातच भागवत कांबळे यांचा मृत्यू झाला. घटना घडली तेंव्हा आरोपी राजेंद्र यांची मुलगी व मृताची नात निकीता राजेंद्र कांबळे (वय १८) ही उपस्थित होती. आरोपी राजेंद्र हा दारू पिऊन वडिल व कुटुंबातील लोकांना सतत मारहाण करीत असल्याने आजुबाजूच्या लोकांनी दुर्लक्ष केले. घटना समजताच संगमनेर उपविभागीय अधिकारी रोशन पंडित, पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे व पोलीस सहकाºयांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी आरोपीस अटक केली आहे. 

Web Title: Drunken son kills father; Accused arrested