मद्यपींना महिलांनी चोपले; कोतूळ इंदिरानगरमधील प्रकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 13:46 IST2020-03-21T13:44:42+5:302020-03-21T13:46:04+5:30

कोतूळ येथे इंदिरानगर परिसरात शुक्रवारी दुपारी एक वाजता दोन अवैध दारू विक्रेते व दहा मद्यपींना गावातील दहा ते पंधरा महिलांनी चोप दिला. मद्यपींनी जीव मुठीत धरून पळाले.

Drunk women were drunk; Types in Kotol Indiranagar | मद्यपींना महिलांनी चोपले; कोतूळ इंदिरानगरमधील प्रकार 

मद्यपींना महिलांनी चोपले; कोतूळ इंदिरानगरमधील प्रकार 

कोतूळ : इंदिरानगर परिसरात शुक्रवारी दुपारी एक वाजता दोन अवैध दारू विक्रेते व दहा मद्यपींना गावातील दहा ते पंधरा महिलांनी चोप दिला. मद्यपींनी जीव मुठीत धरून पळाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील सर्व परवानाधारक देशी, विदेशी दारू दुकाने गुरुवारपासून बंद ठेवण्यात आली. मात्र कोतूळ येथील इंदिरानगर परिसरातील दोन अवैध दारू विक्रेत्यांनी सकाळपासून दारू विक्री सुरू केली. दुपारी एक वाजता येथे दारू घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. काही मद्यपी तेथेच झिंगत पडले होते. तर काही दुचाकीवर ये -जा करत होते. होणारी गर्दी लक्षात घेताच परिसरातील दहा ते पंधरा महिला एकत्र आल्या. त्यांनी थेट अवैध दारू विक्री करणा-या दोन जणांना व दहा मद्यपींना चोप द्यायला सुरुवात केली.   ही घटना घडताच कायम उशिरा येणारे पोलीस दहा मिनिटात हजर झाले. पोलिसांना देखील या महिलांनी चांगलेच फैलावर घेतले.

Web Title: Drunk women were drunk; Types in Kotol Indiranagar