शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या नेत्याची निष्क्रियता झाकण्यासाठी उपोषणाचे नाटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:18 IST

कोपरगाव नगरपरिषदेमध्ये मंगळवारी (दि. १२) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी शहरातील विकासकामांना मंजुरी न दिल्याच्या निषेधार्थ ...

कोपरगाव नगरपरिषदेमध्ये मंगळवारी (दि. १२) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी शहरातील विकासकामांना मंजुरी न दिल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी बुधवारी (दि. १३) छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. त्याचा भाजप, शिवसेना तसेच मित्र पक्षाच्या नगरसेवकांनी गुरुवारी (दि. १४) पत्रकार परिषद घेऊन समाचार घेतला.

संधान म्हणाले, कोपरगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने गेली चार वर्षे एकही काम शिवसेना - भाजप मित्रपक्षाच्या नगरसेवकांनी नामंजूर केलेली नाही. परंतु, नगरपरिषदेने काढलेल्या निविदेमध्ये एकूण २८ कामांचा समावेश असताना मात्र स्वतःच्या लाभाचीच १२ कामे मीटिंगसमोर आणली होती. सर्वच कामे मंजुरीसाठी यावीत असा आमचा नगरसेवकांचा आग्रह होता. विशेष म्हणजे ही सर्व कामे १४ व्या वित्त आयोगातून व नगरपालिकेच्या फंडातून होणार आहेत. यामध्ये विद्यमान आमदारांचा कवडीचाही निधी नाही. मात्र, राष्ट्रवादीचे नगरसेवक सोशल मीडियावर हा निधी आमदारांनी आणला आहे अशा खोट्या बातम्या देत आहेत. या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो. विरोधी नगरसेवक त्यांचे हेच पाप झाकण्यासाठी कोल्हे गटाचे नगरसेवक विकासाला विरोध करीत असल्याचा खोटा डांगोरा पिटत आहेत. सध्या नगर परिषदेत काळे गट, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व बांधकाम अभियंता यांची सहमती एक्स्प्रेस सुसाट सुटली आहे.

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी स्वतःच्या सत्तेचा गैरफायदा घेत नगर परिषद व पोलीस प्रशासनाला हाताशी धरून लाक्षणिक उपोषणाला बसले. वास्तविक पाहता कोपरगाव शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू केलेली असताना प्रशासनाने या उपोषणाला परवानगी दिलीच कशी, असा टोलाही उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विरोधकांना लगावला आहे. यावेळी भाजप नेते पराग संधान, उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, नगरसेवक कैलास जाधव, विजय वाजे, योगेश बागुल, जनार्दन कदम, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, बबलू वाणी, विजय आढाव यांच्यासह भाजप शिवसेना व मित्रपक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

..........

फोटो१४- प्रेस

140121\img_20210114_151001.jpg

कोपरगाव पत्रकार परिषदेत बोलताना भाजपा नेते पराग संधान, समवेत स्वप्नील निखाडे, कैलास जाधव, विजय वाजे, योगेश बागुल, जनार्दन कदम, माजी संजय सातभाई, बबलू वाणी, विजय आढाव आदी.