दुर्गादेवी मंदिरातील दानपेटी फोडली; ढवळपुरीतील येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 18:14 IST2020-01-04T18:13:44+5:302020-01-04T18:14:29+5:30
ढवळपुरी येथील दुर्गादेवी मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे पंधरा हजारांचा ऐवज लांबविला. शुक्रवारी रात्री ही घटना घडली.

दुर्गादेवी मंदिरातील दानपेटी फोडली; ढवळपुरीतील येथील घटना
भाळवणी : पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील दुर्गादेवी मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे पंधरा हजारांचा ऐवज लांबविला. शुक्रवारी रात्री ही घटना घडली.
ढवळपुरी गावालगत असणा-या दुर्गादेवी मंदिरातील दानपेटी शुक्रवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी पहिल्यांदा दानपेटीवरील पत्रा कापून त्याखालील काँक्रिट फोडले. त्यातून रोख रक्कम व वस्तू लांबवल्या. शनिवारी सकाळी ही घटना भाविकांच्या लक्षात आली. यासंदर्भात पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. यावेळी पारनेरचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी, पो.हे.कॉ. शिवाजी कदम यांनी ठसेतज्ज्ञ व श्वानपथकासह घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. याबाबत राणबा खांडके, बाळासाहेब गवळी यांनी पारनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. शिवाजी कदम करीत आहेत. या घटनेमुळे भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे.