घाई करू नका, पेरणी योग्य पाऊस नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:14 IST2021-06-23T04:14:42+5:302021-06-23T04:14:42+5:30
संगमनेर तालुका कृषी विभागाच्या वतीने २१ जून ते १ जुलै दरम्यान कृषी संजीवनी सप्ताह साजरा होत आहे. यानिमित्ताने शेतकऱ्यांच्या ...

घाई करू नका, पेरणी योग्य पाऊस नाही
संगमनेर तालुका कृषी विभागाच्या वतीने २१ जून ते १ जुलै दरम्यान कृषी संजीवनी सप्ताह साजरा होत आहे. यानिमित्ताने शेतकऱ्यांच्या बांधावर गावनिहाय बैठका सुरु आहेत. कृषी विभागाने पठार भागातील कोठे बु., बोरबन,अकलापूर आदी ठिकाणी बैठका घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. फवारणी करताना वापरायचे किटचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडल कृषी अधिकारी हिरालाल सुर्वे,कृषी पर्यवेक्षक मोतीराम रहाणे,कृषी सहायक दिलीप हारदे, वाय.बी.शेंडे,एस.व्ही.जाधव यांसह सरपंच आशिष वाकळे,उपसरपंच किरण वाकळे,बाळासाहेब भालके,लक्ष्मण वाकळे यांसह ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.
शेंडे म्हणाले, पेरणी करताना बियाणे ५ सेंमी खोलवर पेरले जाईल या पद्धतीने योग्य नियोजन करावे. नगर जिल्ह्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज कृषी हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. तसेच शेतकऱ्यांनी गोपीनाथ मुंडे अपघाती विमा योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
कृषी संजीवनी २०२१ च्या मोहिमेंतर्गत बीबीएफ लागवड,बीजप्रक्रिया, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, कापूस एक गाव एक वाण, सुधारित भात लागवड तंत्रज्ञान, ऊस लागवड तंत्रज्ञान, कडधान्य व तेलबिया क्षेत्रात आंतर पीक, विकेल ते पिकेल अंतर्गत नावीण्यपूर्ण पिकांचे लागवड, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, तालुक्यातील दोन पिकात उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा सहभाग, जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना या योजनांबाबत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.