सत्कार नकोत, दुष्काळ निधीसाठी मदत द्या : सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 14:15 IST2019-06-01T14:11:28+5:302019-06-01T14:15:34+5:30

राज्यात दुष्काळाची तीव्रता गंभीर आहे.

Do not fret, help for drought relief: Sujay Vikhe | सत्कार नकोत, दुष्काळ निधीसाठी मदत द्या : सुजय विखे

सत्कार नकोत, दुष्काळ निधीसाठी मदत द्या : सुजय विखे

अहमदनगर : राज्यात दुष्काळाची तीव्रता गंभीर आहे. अहमदनगर जिल्ह्यातही दुष्काळाची तीव्रता अधिक असून अशा परिस्थितीत माझ्या सत्कार सोहळयासाठी कोणताही खर्च करू नका. याऊलट हा खर्च कार्यकर्त्यांनी दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावा, असे आवाहन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून केले आहे.
जिल्ह्यातील सर्व महायुतीचे कार्यकर्ते, हितचिंतक यांच्यासह सर्वसामान्य मतदारांनी विश्वासाने दिलेल्या पाठबळामुळे विजय झाला आहे. या विजयाचा आनंद व्यक्त होणे स्वाभाविक आहे. मात्र सद्यपरिस्थितीत संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावारांच्या चा-याची उपलब्धता करून देण्याचे आवाहन आपणासमोर आहे. या सर्व परिस्थितीत आयोजित केले जाणारे सत्कार सोहळे, त्यासाठी होणारा खर्च योग्य नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व हितचिंतकांनी सत्कार सोहळ्यावर होणारा खर्च टाळून हा सर्व निधी दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावा, असे आवाहन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले आहे.

Web Title: Do not fret, help for drought relief: Sujay Vikhe