शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

जिल्हा बँक प्रथमच भाजपाच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 15:16 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पक्षांतराचे वारे वेगाने वाहतायेत़ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नेत्यांच्या कोलांट उड्या सुरू असल्या तरी त्याचे पडसाद सहकारी संस्थांतही उमटत आहेत़

अण्णा नवथरअहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पक्षांतराचे वारे वेगाने वाहतायेत़ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नेत्यांच्या कोलांट उड्या सुरू असल्या तरी त्याचे पडसाद सहकारी संस्थांतही उमटत आहेत़ राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचडांसोबत जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनीही भाजपाची वाट धरली़ जिल्हा बँकेतील थोरात गटाचे संख्याबळ दोनने कमी होऊन विखे यांचे म्हणजेच पर्यायाने भाजपाचे पारडे जड झाले आहे़पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले राधाकृष्ण विखे यांनी भाजपात प्रवेश केला़ त्यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड पुत्र आमदार वैभवसह बुधवारी भाजपात जात आहेत़ जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर हे पिचड यांचे निकटवर्तीय मानले जातात़ तेही आपल्या नेत्यासोबत भाजपच्या तंबूत दाखल होतील़ त्यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा केव्हाच देऊन टाकला आहे़ आमदार वैभव पिचड स्वत: बँकेचे संचालक आहेत़ हे दोघेही थोरात गटाचे होते़ ते भाजपात गेले आहेत़ त्यामुळे ते आता विखे गटात गणले जातील़ त्यामुळे थोरात यांच्या गटाची संख्या दोनने कमी होऊन विखे गटाची दोनने वाढेल़ त्यात पूर्वी थोरात गटात समावेश असलेले ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेली आहे़ तसेच पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळेही थोरात यांच्याच गटाच्या होत्या़ परंतु, विखे भाजपात गेल्याने त्या थोरातांसोबत राहतील की विखेंसोबत, ते आता सांगणे कठीण आहे़जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी ते साखर कारखाने, यांना कर्ज रुपाने पतपुरवठा करणारी ही एकमेव बँक आहे़ त्यामुळे जिल्हा बँकेवरील वर्चस्व कायम ठेवणे जिल्ह्यातील साखर सम्राटांची गरज आहे़ काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आतापर्यंत ते टिकवून ठेवले होते़ परंतु, बदलत्या राजकीय समीकरणांमुळे बँकेवरील सत्तेचा लंबक भाजपाच्या बाजूने झुकलेला दिसतो़थोरात गट (काँगे्रस- राष्ट्रवादी)बाजीराव खेमनर, रामदास वाघ, रावसाहेब शेळके, मीनाक्षी साळुंके, चंद्रशेखर घुले, यशवंतराव गडाख, उदय शेळके, चैताली काळे, अरुण तनपुरे, अरूण जगताप़विखे गट (भाजप)अण्णासाहेब म्हस्के, अंबादास पिसाळ, जगन्नाथ राळेभात, दत्ता पानसरे, मोनिका राजळे, करण ससाणे, शिवाजी कर्डिले, बिपीन कोल्हे, सुरेश करपे, वैभव पिचड, अध्यक्ष सीताराम गायकर,विखे, कर्डिलेंची भूमिका महत्वाचीजिल्हा बँकेच्या राजकारणात गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे व आमदार शिवाजी कर्डिले यांची भूमिका यापुढे महत्वाची ठरणार आहे़ त्यांच्या पक्षाची संख्या वाढल्याने ते ठरवतील तोच यापुढे जिल्हा बँकेचा अध्यक्ष होईल़ येत्या मे महिन्यात बँकेची निवडणूक आहे़ तोपर्यंत विधानसभा निवडणुका होऊन जातील़निवडणुकीत कोण कुठे जातो की आहे तिथेच राहतात, यावरच जिल्हा बँकेचे राजकारण अवलंबून असणार आहे़

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय