श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:22 IST2021-04-23T04:22:45+5:302021-04-23T04:22:45+5:30
ओम महाले यांच्या संकल्पनेतून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप करण्यात आले व यांच्यातर्फे हे सुरक्षिततेचे साहित्य ...

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप
ओम महाले यांच्या संकल्पनेतून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप करण्यात आले व यांच्यातर्फे हे सुरक्षिततेचे साहित्य पोलीस बांधवांना बुधवारी देण्यात आले.
पोपट भगीरथ महाले या फर्मचे डायरेक्टर ओम महाले म्हणाले, कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी देशभरात १५ दिवसांचा लॉकडाऊन आहे. त्यामुळे नागरिक घरी बसून आहेत. पोलीस बांधव मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वत:च्या आयुष्याची पर्वा न करता रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य बजावत आहेत. आपली काळजी घेत आहेत. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये.
श्रीरामपूर पोलीस ठाण्यात १०१ कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना ओम महाले यांच्यातर्फे १०१ सॅनिटायझर, १०१ मास्क देण्यात आले. यावेळी डॉ. दीपाली काळे व श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्याकडे देण्यात आले. याप्रसंगी गणेश बागडे, गौरव काळे व ओम महाले मित्रपरिवार उपस्थित होता.
(वा.प्र.)