हिंगणगाव, निंबळक येथे किराणा किट वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:18 IST2021-07-17T04:18:12+5:302021-07-17T04:18:12+5:30

निंबळक : राज्य शासनाच्या आदिवासी प्रकल्पअंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना खावटी अनुदान योजना २०२१-२२ अंतर्गत अन्नधान्य व किराणा वाटप कार्यक्रम ...

Distribution of grocery kits at Hingangaon, Nimbalak | हिंगणगाव, निंबळक येथे किराणा किट वाटप

हिंगणगाव, निंबळक येथे किराणा किट वाटप

निंबळक : राज्य शासनाच्या आदिवासी प्रकल्पअंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना खावटी अनुदान योजना २०२१-२२ अंतर्गत अन्नधान्य व किराणा वाटप कार्यक्रम हिंगणगाव व निंबळक (ता. नगर) येथे घेण्यात आला. याअगोदर प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यावर दोन हजार रुपये अनुदान जमा करण्यात आले.

पंचायत समितीचे उपसभापती डॉ. दिलीप पवार यांच्याहस्ते लाभार्थ्यांना दोन हजार किमतीचे अन्नधान्य व किराणा किटचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच आबासाहेब सोनवणे होते. कार्यक्रमास आदिवासी आश्रम शाळेचे शिक्षक, राजूर प्रकल्प कार्यालयाचे लिपिक भालेराव, पांडुरंग सोनवणे, भाऊसाहेब सोनवणे, सुनील सोनवणे, अर्जुन अडसूळ, मच्छिंद्र मोरे, निसार पठाण, मयूर सुंबे, गोविंद ढगे, केशव सोनवणे, अब्दुल सय्यद, बाबूमिया सय्यद, मीरसाहेब सय्यद उपस्थित होते.

निंबळकला माजी सरपंच साधना शरद लामखडे यांच्या विशेष प्रयत्नातून २५ आदिवासी कुटुंबांना (खावटी) धान्य व किराणा वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समिती उपसभापती दिलीप पवार, माजी जि. प. सदस्य माधवराव कोतकर, बी. डी. कोतकर, राजेंद्र कोतकर, दत्ता कोतकर, अर्जुन कोतकर, गोरक्षनाथ कोतकर, शरद लामखडे, सुभाष खेसे, भाऊ जऱ्हाड, दत्तात्रय दिवटे, भानुदास कोतकर, जालिंदर हरिभाऊ कोतकर आदी उपस्थित होते.

Web Title: Distribution of grocery kits at Hingangaon, Nimbalak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.