पळशी विकास सोसायटीची डिजिटल सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:35 IST2021-02-05T06:35:38+5:302021-02-05T06:35:38+5:30
टाकळी ढोकेश्वर : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पारनेर तालुक्यातील पळशी सोसायटीने सरपंच गणेश मधे, उपसरपंच आप्पासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ...

पळशी विकास सोसायटीची डिजिटल सेवा
टाकळी ढोकेश्वर : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पारनेर तालुक्यातील पळशी सोसायटीने सरपंच गणेश मधे, उपसरपंच आप्पासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे अध्यक्ष दत्ता पाटील गागरे, उपाध्यक्ष लहानबाई खटाटे, माजी अध्यक्ष अंबरनाथ वाळुंज यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल सेवा सुरू करण्यात आली.
संस्थेच्या ३७५ सभासदांना ३.५५ लाख कर्जमाफी झाली असून, अद्यापपर्यंत ३.४१ लाख कर्ज वितरण केल्याची माहिती सचिव बाळासाहेब पानमंद व दिगंबर सुडके यांनी दिली. पळशी परिसरातील बरेचसे सभासद व्यवसायानिमित्त मुंबई-पुणे व इतर शहरांत वास्तव्यास आहेत. या सभासदांना कर्ज भरणा दिनांक तसेच संस्थेच्या विविध योजनांची माहिती मिळत नसे. सर्व सभासदांना संस्थेच्या विविध योजनांची माहिती व्हावी तसेच आपल्या खात्यातील प्रत्येक व्यवहाराची माहिती मिळून संस्थेचा कारभार पारदर्शी करण्यासाठी संस्थेने ही सेवा सुरू केली आहे.
यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष गंगाराम बरकडे, चंद्रकांत सुडके, किसन मोढवे, अनिल हिंगडे, भिका मधे, रमेश सांबारे, मीराबाई शिंदे, किसन दुधवडे, रामचंद्र जाधव, भानुदास गागरे, ग्रामपंचायत सदस्य संकलेश मोढवे, मोहन शिंदे, नितीन जाधव, भास्कर जाधव, माजी सरपंच संतोष जाधव आदी उपस्थित होते.