शिवसेनेचे माजी नगरसेवक दिगंबर ढवण यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 11:39 IST2020-08-02T11:37:49+5:302020-08-02T11:39:00+5:30

शिवसेनेचे माजी नगरसेवक दिगंबर ढवण (वय ४३) यांचे शनिवारी रात्री (१ आॅगस्ट) ह्रदयविकाराने निधन झाले.

Digambar Dhawan passed away | शिवसेनेचे माजी नगरसेवक दिगंबर ढवण यांचे निधन

शिवसेनेचे माजी नगरसेवक दिगंबर ढवण यांचे निधन

 अहमदनगर : शिवसेनेचे माजी नगरसेवक दिगंबर ढवण (वय ४३) यांचे शनिवारी रात्री (१ आॅगस्ट) ह्रदयविकाराने निधन झाले.

ढवण हे  संध्याकाळी ते फिरायला गेले होते. फिरुन घरी आल्यानंतर त्यांना त्रास व्हायला लागला. त्यांना सावेडी येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी हृदयविकाराने ढवण यांचे निधन झाल्याचं घोषित केले.

दिगंबर ढवण हे महाराज या टोपण नावाने परिचित होते. माजी आमदार अनिल राठोड यांचे विश्वासू कार्यकर्ते होते. धनगर समाजात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.  त्यांनी भिस्तबाग, ढवणवस्ती आदी भागात महापालिकेच्या सत्तेच्या माध्यमातून विविध विकास कामे केली आहेत. नगरसेविका शारदा ढवण यांचे ते पती होत.

Web Title: Digambar Dhawan passed away