शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अन् औद्योगिक ऑक्सिजनमधील फरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:20 IST

......... प्रश्न : वैद्यकीय ऑक्सिजन म्हणजे नेमके काय ? अंबादास : वैद्यकीय ऑक्सिजनला मेडिकल ऑक्सिजन असेही संबोधले जाते. वैद्यकीय ...

.........

प्रश्न : वैद्यकीय ऑक्सिजन म्हणजे नेमके काय ?

अंबादास : वैद्यकीय ऑक्सिजनला मेडिकल ऑक्सिजन असेही संबोधले जाते. वैद्यकीय ऑक्सिजनमध्ये उच्च प्रतीची शुद्धता असते. हा ऑक्सिजन वैद्यकीय उपचारांसाठी वापरला जातो. या सिलेंडरमध्ये ऑक्सिजन वायूची उच्च प्रतीची शुद्धता असते. साधारण ९९.५ ते ९९.९ टक्के ही शुद्धता असते.

............

प्रश्न : औद्योगिक ऑक्सिजन आणि वैद्यकीय ऑक्सिजनमधील फरक काय ?

अंबादास : औद्योगिक ऑक्सिजन आणि वैद्यकीय ऑक्सिजनमध्ये खूप मोठा फरक आहे. वैद्यकीय ऑक्सिजन सिलेंडरच्या गळ्याभोवती पांढरा रंग असतो. बाकीचा सिलेंडर काळ्या रंगामध्ये असतो. वैद्यकीय ऑक्सिजन मानवी शरीरात वापरण्यासाठी विकसित केला जातो.

...........

प्रश्न : वैद्यकीय ऑक्सिजन भरतेवेळी काय काळजी घेतली जाते ?

अंबादास : वैद्यकीय ऑक्सिजन सिलेंडरमध्ये भरतेवेळी दुसरा कुठलाही वायू मिसळणार नाही, याची काळजी घेतली जाते. सिलेंडर भरल्यानंतर त्याची शुद्धता तपासली जाते. दूषित होण्यापासून रोखण्यासाठी सिलेंडर भरण्यापूर्वी तपासणी केली जाते. सिलेंडरच्या वॉल्वमध्ये ग्रीस, ऑईल किंवा केमिकल चिकटले असेल तर ते साफ केले जाते. सिलेंडर भरण्यापूर्वी त्याची Odor test केली जाते. यामध्ये सिलेंडरच्या वाॅल्वची चावी खुली करून वायूच्या वासाची चाचणी केली जाते. वासाची चाचणी करताना कसल्याही प्रकारचा दुर्गंध आला तर तो सिलेंडर फिलींग विभागातून वेगळा केला जातो. सिलेंडर भरून झाल्यावर योग्य लेबल लावून त्याची नोंद केली जाते.

वैद्यकीय ऑक्सिजन सिलेंडर दूषित पदार्थांपासून मुक्त असणे आवश्यक आहे. इतर कारणांसाठी वापरलेले सिलेंडर वैद्यकीय ऑक्सिजनसाठी वापरले जाणार असतील तर ते रिकामे केले जातात. पूर्णपणे साफ करून त्याला योग्य ते लेबल लावले जाते. त्यानंतर ते सिलेंडर भरले जाते.

............

प्रश्न : वैद्यकीय ऑक्सिजनचा वापर नेमका कसा केला जातो ?

अंबादास : वैद्यकीय ऑक्सिजनचा वापर विविध ठिकाणी केला जातो. सामान्यत: वैद्यकीय ऑक्सिजन रुग्णालये आणि क्लिनिकसारख्या वैद्यकीय सुविधांमध्ये दिले जाते. हे अनेस्थेसिया दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रथमोपचार, स्वत: श्वास घेऊ शकत नाही अशा रुग्णांना ऑक्सिजन थेरपी दिली जाते. वैद्यकीय ऑक्सिजन वापरण्यासाठी अतिरिक्त आवश्यकता आणि नियम आहेत. ज्यात एखाद्या व्यक्तीस वैद्यकीय ऑक्सिजनची गरज पडल्यास डॉक्टरांचे मार्गदर्शन आवश्यक आहे. रुग्णांना त्यांच्या गरजेनुसार ऑक्सिजन योग्य प्रमाणात दिला जातो. रुग्णाची शरीरयष्टी, वय, विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीसाठी वेगवेगळ्या प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता असते. त्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेण्याची गरज असते.

.............

प्रश्न : औद्योगिक ऑक्सिजन म्हणजे नेमके काय ?

अंबादास : औद्योगिक ऑक्सिजन सिलेंडर हा पूर्ण काळ्या रंगामध्ये असतो. हा ऑक्सिजन औद्योगिक वसाहतीत कटिंग, वेल्डींगसह इतर रासायनिक प्रक्रियांसह अनेक औद्योगिक कामात वापर केला जातो. हा ऑक्सिजन हा मानवी वापरासाठी योग्य नाही. कारण औद्योगिक वसाहतीत विषारी केमिकल, विषारी वायू, धूळ कचरा, ऑईल यांचा सिलिंडरमध्ये मिसळण्याचा जास्त धोका असतो. गलिच्छ उपकरणे किंवा औद्योगिक संग्रहालय अशुद्ध असू शकते.

..........

प्रश्न : औद्योगिक ऑक्सिजन हा वैद्यकीय क्षेत्रासाठी वापरता येऊ शकतो का ?

अंबादास : औद्योगिक ऑक्सिजनची शुद्धता उच्च प्रतीची नसते. सिलेंडरच्या आतमध्ये कचरा, धूळ, अशुुद्ध पाणी गंंज असण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे तो वैद्यकीय उपचारासाठी वापरण्यास योग्य नसतो.

................

प्रश्न : इतर क्षेत्रातही ऑक्सिजनचा वापर केला जातो का ?

अंबादास : हो केला जातो. काही विशिष्ट व्यवसायांसाठी किंवा वापरासाठी लोकांना उच्च-शुद्धता ऑक्सिजनची आवश्यकता असते, असा एक गैरसमज आहे. मात्र ते खरे नाही. अग्निशामक कर्मचारी, खोल समुद्रातील डायव्हिंग इत्यादीसाठी उच्च शुद्धतेच्या ग्रेड ऑक्सिजनचा वापर केला जात नाही. यापैकी बऱ्याच घटनांमध्ये नियमित वातावरणातील शुद्ध हवेचा उपयोग केला जातो.

...............

...............